अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यात 1045 इराणी नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:10 IST2026-03-04T19:06:02+5:302026-03-04T19:10:48+5:30

Iran Israel War: इस्रायली सैन्याचे राजधानी तेहरानमध्ये बुधवारीही हल्ले सुरू.

US Israel Iran War News: 1045 Iranian citizens killed in US and Israeli attacks, official figures revealed | अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यात 1045 इराणी नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढणार...

अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यात 1045 इराणी नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढणार...

US Israel Iran War News: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, आजही(बुधवारी) सकाळी इराणची राजधानी तेहरान येथे अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. 

परिस्थिती आणखी चिघळणार...

दरम्यान, इस्रायलने सांगितले की, इराणकडून डागण्यात आलेल्या मिसाइल हल्ल्यांमुळे त्यांना एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करावी लागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या युद्धाबाबत प्रतिक्रिया देताना हा संघर्ष अजून काही आठवडे किंवा त्याहून अधिक काळ चालू शकतो, असे संकेत दिले आहेत.

मृतांचा आकडा 1,045 वर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमधील एका सरकारी संस्थेच्या हवाल्याने दावा केला जातोय की, अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षात इराणमध्ये आतापर्यंत किमान 1,045 लोकांचा मृत्यू झाला आहे. फाउंडेशन ऑफ मार्टर्स अँड व्हेटरन्स अफेयर्स या संस्थेने सांगितले की, ही संख्या ओळख पटवून दफनासाठी तयार करण्यात आलेल्या मृतदेहांच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे.

इराणकडून मिसाइल आणि ड्रोन हल्ले

इस्रायलने इराणच्या मिसाइल लॉन्चर आणि एका अणु संशोधन केंद्रावर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल, अमेरिकन दूतावास आणि गल्फ प्रदेशातील काही भागांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे ऊर्जा पुरवठा आणि हवाई उड्डाणांवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागनने कुवैतमधील कमांड सेंटरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झालेल्या अमेरिकन आर्मी रिझर्व्हच्या चार सैनिकांची ओळख जाहीर केली आहे.

Web Title : अमेरिकी, इजरायली हमलों में 1,045 ईरानी नागरिक मारे गए; आधिकारिक आंकड़ा सामने।

Web Summary : ईरान में अमेरिकी-इजरायली संघर्ष में 1,045 मौतें। मिसाइल हमलों और जवाबी कार्रवाई से तनाव बढ़ा, ऊर्जा और उड़ानें प्रभावित। कुवैत में ड्रोन हमले में अमेरिकी हताहतों की पुष्टि। संघर्ष हफ्तों तक चल सकता है।

Web Title : US, Israel attacks kill 1,045 Iranians; Official figures revealed.

Web Summary : Iran reports 1,045 deaths in US-Israel conflict. Tensions escalate with missile attacks and retaliations, impacting energy and flights. US confirms casualties in Kuwait drone strike. Conflict may extend weeks.