शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News US-Israel Iran War Live: "आम्ही हे युद्ध सुरू केले नाही, पण पण ते नक्कीच संपवू"; अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 20:20 IST

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

02 Mar, 26 08:47 PM

आम्ही जिंकण्यासाठी लढतो: अमेरिका

इराणशी युद्ध सुरू असताना, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एक मोठे विधान केले. युद्धकाळात, कोणत्याही देशाला शत्रू देशावर हल्ला करण्यापासून रोखणारे युद्धाचे कोणतेही नियम नसावेत. सैन्याचे काम लोकशाही निर्माण करणे नाही. आम्ही जिंकण्यासाठी लढतो आणि वेळ वाया घालवत नाही.

02 Mar, 26 08:19 PM

आमचे मुख्य लक्ष्य इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करणे

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे की इराणविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेची तुलना इराक युद्धाशी केली जाऊ नये. तसेच आमचे मुख्य लक्ष्य इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करणे हेच आहे, असं अमेरिकेने सांगितले.

02 Mar, 26 07:43 PM

पंतप्रधान मोदी यांनी बहरीन आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाशी केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा आणि सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणादरम्यान दोन्ही देशांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला.

02 Mar, 26 07:42 PM

इराणच्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू

ओमानमध्ये इराणच्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. ओमानी माध्यमांनुसार, इराणने एका तेल टँकरवर हल्ला केला, ज्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला.

02 Mar, 26 05:48 PM

अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमध्ये इराणच्या १३१ शहरांना फटका, ५५५ लोकांचा मृत्यू

इराणने दावा केला आहे की अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये ५५५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १३१ शहरांवर परिणाम झाला आहे. म्हणून इराणने इस्रायल आणि अरब देशांवर क्षेपणास्त्रे डागत आहे. तर इस्रायली आणि अमेरिकन सैन्याने इराणी लष्करी तळांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे.

02 Mar, 26 04:29 PM

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धात ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, स्पष्ट केली भूमिका

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध आता अधिकच तीव्र झाले आहे. इराणने आज पुन्हा एकदा मध्यपूर्वेतील सौदी आदी देशांवर जबरदस्त हल्ला चढवला असून संपूर्ण मध्यपूर्वेत दहशतीचे वातावरण निर्माम झाले आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने मोठी घोषणा केली आहे. इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी मोहिमेत आपण सहभागी होणार नाहीत आणि तणाव वाढल्यास मध्यपूर्वेत आपले सैन्यही तैनात करणार नाहीत, असे ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

02 Mar, 26 03:49 PM

तारापूर एमआयडीसीतील कंपनीत वायू गळती, जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरून पळताना दिसले लोक; व्हिडिओ व्हायरल 

पालघर - तारापूर एमआयडीसी मधील एका कंपनीत मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने अनेकांच्या श्वास कोंडला असून काही कामगार बेशुद्ध पडल्याची माहिती समोर येत आहे. शेकडे लोक आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरून पळताना दिसत आहेत. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

02 Mar, 26 03:13 PM

चर्चेतून तोडगा काढला जावा, मोदींनी केले आवाहन

मध्य पूर्वेतील युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचं आवाहन केले आहे.  परिस्थिती चिंताजनक असून सध्याचे संकट केवळ संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांद्वारेच सोडवता येईल. दुसरा कोणताही मार्ग नाही. भारत शांतता, स्थैर्यासाठी काम करतेय आणि भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. भारत सर्व देशांसोबत काम करेल. भारत सर्व वाद चर्चा आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्यास पाठिंबा देतो असं मोदींनी म्हटलं आहे. 

02 Mar, 26 02:45 PM

इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला

अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यात, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्यानंतर, इराण प्रचंड चवताळला आहे. त्याने आपल्या हल्ल्यांची तीव्रता आणखीनच वाढवल्याचे दिसत आहे. इराणच्या हल्ल्याने संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने गेल्या २४ तासांत १५ हून अधिक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. आता हे युद्ध थांबावे, अशी अमेरिका आणि इस्रायलची इच्छा आहे. मात्र, इराणचा बदला अद्याप बाकी आहे. यासंदर्भात आपण अमेरिकेशी कसल्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या भीषण संघर्षात इराणने आता सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'वरही हल्ला केलयाचे आहे. (सविस्तर वाचा)

02 Mar, 26 01:43 PM

अभिनेत्रीने सांगितली दुबईतील सत्य परिस्थिती

सध्या दुबईतील परिस्थिती बिकट झाली असून एरिकाने तिथल्या सद्यस्थितीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. "यूएई सरकारने हे संकट अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. अधिकारी ज्या प्रकारे परिस्थितीला प्रतिसाद देत आहेत, ते मी स्वतः पाहिलं आहे. तरीही युद्धाच्या वातावरणात राहणं सोपं नाही. एअर डिफेन्स इंटरसेप्शनचे, स्फोटाचे आवाज खरे आणि खूप भयानक आहेत. माझे मित्र, कुटुंब आणि आजूबाजूचे लोक हे सर्व डोळ्यांनी पाहत आहेत, हा अनुभव सांगण्यासारखा नाही, तर तो खरोखरच धडकी भरवणारा आहे" असं म्हटलं आहे.वाचा सविस्तर
 

02 Mar, 26 12:39 PM

इस्रायलने इराणच्या दाट लोकवस्तीवर ६ मिसाइल डागल्या

अमेरिका इस्रायलने इराणविरोधात आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्रायलने इराणी शहर सानंदजवर हल्ला केला. शहरातील दाट लोकवस्तीत इस्रायलने ६ मिसाइल डागल्या आहेत. त्यात पोलीस स्टेशनसह रहिवासी इमारतीही उद्ध्वस्त झाल्या. इस्रायलने लेबनॉनवरही हल्ला केला. या हल्ल्यात ३१ लोक मारले गेले तर १४९ जण जखमी झालेत. 

02 Mar, 26 12:12 PM

दुबईमध्ये अजूनही इराणी हल्ले होत आहेत?

अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. इराणनेही प्रत्युत्तर म्हणून हल्ले सुरू केले आहेत. इराणने 'यूएई'सह अनेक शेजारी देशांवर हल्ले केले आहेत. शनिवारी युएईची राजधानी दुबईमध्येही मोठे हल्ले झाले. इराणी हल्ल्यांमुळे एका पंचतारांकित हॉटेलचे नुकसान झाले. बुर्ज खलिफा टॉवरला धोका निर्माण झाला. हा हल्ला एकदाच झाला आहे, या हल्ल्यानंतर पुन्हा हल्ले झालेले नाहीत. (सविस्तर वाचा)

02 Mar, 26 11:54 AM

अमेरिकेचे F-15 विमान इराणने पाडले?

इराणने अमेरिकेचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. इराणी मीडिया आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये एफ-१५ जेट खाली सरकताना दिसत आहे. या विमानाच्या मागच्या बाजूस आग लागल्याचे दिसते. स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

02 Mar, 26 11:34 AM

शिक्षणतज्ज्ञ आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

शिक्षणतज्ज्ञ, थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे (वय, ९१) यांचे आज सकाळी साडेआठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक अभ्यासू, संयमी आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
 

02 Mar, 26 11:19 AM

आणखी अमेरिकन लोकाचे जीव जातील -डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाबद्दल एक मोठे विधान केले आहे. "आम्ही पूर्ण लष्करी शक्तीनिशी लढत आहोत. दुर्दैवाने आणखी काही अमेरिकन लोकांचे जीव जातील. युद्धात असेच होत असते. पण, जोपर्यंत आमचे लक्ष्य साध्य होत नाही, तोपर्यंत अमेरिका हल्ले सुरूच ठेवणार आहेत", असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

02 Mar, 26 11:00 AM

इराणचा अबू धाबीतील फ्रान्स नौदल तळावर ड्रोन हल्ला

अबू धाबीतील फ्रान्सच्या नौदल तळावर इराणने ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात तळावरील हँगरचे नुकसान झाले असं फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. इराणकडून केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले बहरीनमध्ये तैनात असलेल्या सुमारे ३०० ब्रिटिश लष्करी कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळ केले गेले. या हल्ल्यामुळे ब्रिटीश सैन्याच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे फ्रान्सने सांगितले. 

02 Mar, 26 10:24 AM

इराणच्या हल्ल्यात 'अ‍ॅमेझॉन'च्या क्लाउड सेंटरला आग

मागील दोन दिवसांपासून  अमेरिका-इस्रायल या दोन देशांनी इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे प्रमुख नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता इराणनेही प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने युएई येथील अमेरिकन सैन्याच्या बेसवर हल्ले केले आहे. याचा फटका क्लाउड सेंटरला बसला आहे.  अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड युनिट, AWS नुसार, UAE मधील डेटा सेंटर्समध्ये आग लागल्याची नोंद झाली आहे. संयुक्त अरब अमिराती मधील त्यांच्या एका डेटा सेंटरचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करावा लागला, अशी माहिती अ‍ॅमेझॉनने दिली.  (सविस्तर वाचा)

02 Mar, 26 10:18 AM

गांधी आणि खतम अल-अनबिया रुग्णालयावर अमेरिका-इस्रायलचे हल्ले

इराणवर इस्रायल आणि अमेरिकेचे हल्ले सुरूच असून, संघर्षाचा भडका उडाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गांधी आणि खतम अल अनबिया रुग्णालयावर, इराणी रेड क्रिसेंट पीस इमारतीवर ड्रोन डागण्यात आले. 

एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात दोन्ही रुग्णालयांच्या खिडक्या आणि बाहेरच्या भागाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. इराणी माध्यमांनी म्हटले आहे की, रुग्णालयांनाच लक्ष्य करण्यात आले आहे. 

इराणच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, या दोन रुग्णालयांशिवाय, मोतीहारी रुग्णालय, अबुजर रुग्णालय आणि सरब, चाबहार, तसेच हमदानमधील तीन आपत्कालीन केंद्रांचे इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात नुकसान झाले आहे. 

02 Mar, 26 09:56 AM

मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय शेअर बाजाराला जोरदार फटका

अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. बाजार उघडताच सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स ९१४.१५ अंकांच्या जोरदार घसरणीसह ८०,३७३.०४ च्या पातळीवर आला. याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी देखील २४६.४० अंकांच्या घसरणीसह २४,९३२.२५ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.

02 Mar, 26 09:50 AM

इराण-इस्रायल युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ

मध्य पूर्वेतील युद्धामुळे सोने चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख ६७ हजार इतका झाला आहे. जवळपास अडीच टक्क्यांनी सोन्याचे दर वाढले आहेत. चांदीची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढली असून आजचे दर २ लाख ९४ हजार प्रति किलोवर पोहचले आहेत. 

02 Mar, 26 09:08 AM

दुबई विमानतळावर बाहेर हल्ला, स्फोट होताच लोक पळाले

इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांनी यूएई, सौदी अरेबिया, बहरीन या देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे. दुबई विमानतळापासून काही अंतरावरच एक ड्रोन हल्ला झाला. हल्ल्यानंतर विमानतळावरील लोक सैरभैर पळायला लागले. 

02 Mar, 26 09:03 AM

UAE मध्ये इराणच्या हल्ल्याचा फायदा घेत सायबर ठगांचा उच्छाद

 संयुक्त अरब अमिरातीमध्येइराणकडून झालेल्या हल्ल्यांचा फायदा घेत सायबर ठग सक्रिय झालेत. लोकांच्या डिजिटल ओळखीशी संबंधित संवेदनशील माहिती चोरून ते बँक खात्यातून पैसे लंपास करत असल्याची माहिती समोर आलीये. दुबई पोलिसांनी नोटीस जारी करून यासंदर्भात इशाराही दिलाय. सायबर ठग स्वतःला 'दुबई क्राइसिस मॅनेजमेंट'शी संबंधित असल्याचं सांगून किंवा पोलिसांशी संबंधित असल्याचा दावा करून UAE Pass आणि Emirates ID ची माहिती मागत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. अशी माहिती शेअर केल्यामुळे सिम कार्ड आणि बँकिंग फसवणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजची त्वरित तक्रार करावी, असं आवाहनही अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. (सविस्तर वाचा)

02 Mar, 26 08:58 AM

इराणला 'या' मुस्लीम देशांनी दिला इशारा, आणखी भडका उडणार

गल्फ को-ऑपरेशन काँऊन्सिल (जीसीसी) सदस्य असलेल्या देशांची रविवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत इराणच्या हल्ल्यांमुळे होत असलेल्या नुकसानीवर चर्चा करण्यात आली. 

नागरी वस्त्यांनाच लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन इराणकडून केलं गेलं आहे. इराणने हल्ले थांबवावेत नाहीतर आमच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य पावले उचलावी लागतील, असा इशारा जीसीसीकडून दिला गेला आहे. 

संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरब, ओमान, कतार, कुवैत हे देश जीसीसीमध्ये आहेत. 

02 Mar, 26 08:30 AM

खामेनेई यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इराण मैदानात उतरला

इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ इराणने रविवारी घेतली. इराणने आखाती देश आणि इस्रायलमधील अमेरिकेच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. अमेरिका आणि इस्रायलने रविवारीही बॉम्बहल्ला सुरूच ठेवला. (आणखी वाचा)

टॅग्स :IranइराणUSअमेरिकाIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDubaiदुबईNarendra Modiनरेंद्र मोदी