Erica Fernandes : "स्फोटाचे आवाज भयानक, धडकी भरवणारा अनुभव..."; अभिनेत्रीने सांगितली दुबईतील सत्य परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:24 IST2026-03-02T13:22:05+5:302026-03-02T13:24:52+5:30
Erica Fernandes : सध्या दुबईतील परिस्थिती बिकट झाली असून एरिकाने तिथल्या सद्यस्थितीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

Erica Fernandes : "स्फोटाचे आवाज भयानक, धडकी भरवणारा अनुभव..."; अभिनेत्रीने सांगितली दुबईतील सत्य परिस्थिती
'कसौटी जिंदगी की २' फेम अभिनेत्री एरिका फर्नांडिस २०२३ मध्ये भारत सोडून दुबईला स्थायिक झाली होती. नवीन संधी आणि भारतीय टीव्ही मालिकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे प्रोजेक्ट्स करण्याच्या उद्देशाने तिने हा मोठा निर्णय घेतला होता. भारतीय टीव्हीवरील कंटेंट आता जुनाट झाला असून तो आपल्या क्रिएटिव्ह व्हिजनशी जुळत नसल्याचंही तिने म्हटलं होतं. मात्र सध्या दुबईतील परिस्थिती बिकट झाली असून एरिकाने तिथल्या सद्यस्थितीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे दुबईलाही टार्गेट केलं जात आहे. अनेक उड्डाणं रद्द झाल्यामुळे अनेक पर्यटक दुबईमध्ये अडकले आहेत. ईशा गुप्ता, सोनल चौहान आणि अजित कुमार हे कलाकारही सध्या दुबईतच आहेत. याच दरम्यान चाहत्यांना एरिका फर्नांडिसची काळजी वाटत होती, त्यावर तिने आपण सुरक्षित असल्याचं आता स्पष्ट केलं आहे.
"आता गमावण्यासारखं काहीच नाही..."; इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री
'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना एरिका म्हणाली, "यूएई सरकारने हे संकट अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. अधिकारी ज्या प्रकारे परिस्थितीला प्रतिसाद देत आहेत, ते मी स्वतः पाहिलं आहे. तरीही युद्धाच्या वातावरणात राहणं सोपं नाही. एअर डिफेन्स इंटरसेप्शनचे, स्फोटाचे आवाज खरे आणि खूप भयानक आहेत. माझे मित्र, कुटुंब आणि आजूबाजूचे लोक हे सर्व डोळ्यांनी पाहत आहेत, हा अनुभव सांगण्यासारखा नाही, तर तो खरोखरच धडकी भरवणारा आहे."
"अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
एरिकाने लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. "आम्ही शांतपणे काम करत आहोत आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवत आहोत. सध्या आम्ही इतकंच करू शकतो" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
"आकाशात क्षेपणास्त्रे, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video
एरिका दुबईत राहूनही भारतीय ओटीटी शोज करत आहे. भारत आणि दुबई या दोन्ही ठिकाणी वर्क बॅलेन्स ती उत्तम प्रकारे सांभाळत आहे. दुबईत स्थायिक झाल्यावर तिने व्यवसायातही पाऊल टाकलं असून तिचं स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. ती २०२४ मध्ये 'लव्ह अधूरा' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. 'कसौटी जिंदगी की' रीबूट आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली.