US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 20:15 IST2026-04-03T19:54:04+5:302026-04-03T20:15:17+5:30

US Israel Iran War : इराणच्या एका सरकारी टीव्ही चॅनलने दावा केला आहे की, नैऋत्य इराणमध्ये एका अमेरिकन पायलटने विमानातून बाहेर उडी मारली. या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही आणि अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या चॅनलने पायलटला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केले आहे. यापूर्वी, इराणने पायलटला पकडण्यात आल्याचा दावा केला होता.

US Israel Iran War Iran's U-turn Earlier it said 'pilot in custody', now reward for finding; Suspense regarding US pilot | US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स

US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स

US Israel Iran War : गेल्या महिनाभरापासून पश्चिम आशियामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध पेटले आहे. अजूनही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच पुन्हा उघडणार असल्याचे वारंवार सांगितले आहे. दरम्यान, इराण आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहे.

इराणच्या सरकारी टीव्हीशी संलग्न असलेल्या एका स्थानिक वाहिनीने शुक्रवारी एक दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, एका अमेरिकन लढाऊ वैमानिकाने आपल्या विमानातून बाहेर उडी मारली आणि नैऋत्य इराणमध्ये त्याचे विमान कोसळले. इराणने यापूर्वी वैमानिकाला पकडण्यात आल्याचा दावा केला होता, पण नंतर बक्षीस जाहीर केले.

India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा

जो कोणी त्या पायलटला जिवंत पकडून पोलिसांच्या ताब्यात देईल, त्याला बक्षीस देण्याची घोषणाही चॅनलने केली आहे. अमेरिकेने अजूनही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकी लष्कर, पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसने या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया केलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये हल्ले आणि प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू आहेत. दरम्यान, अमेरिकन वैमानिकाचे विमान प्रत्यक्षात इराणी भूमीवर कोसळले, तर या प्रकरणाचे मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते, असा दावा इराणने केला आहे.

जर पायलट जिवंत पकडला, तर इराणच्या हाती एक मोठे शस्त्र लागेल. इराण याचा वापर सौदेबाजीसाठी करू शकतो, अमेरिकेवर हल्ले थांबवण्यासाठी दबाव आणणे, किंवा अमेरिकेचे नुकसान झाले आहे हे जगाला दाखवून देणे असे इराण करु शकतो. याचा वापर इराण वाटाघाटीसाठी करु शकतो. पायलटच्या सुटकेसाठी दबाव आणला जाऊ शकतो.

Web Title : ईरान का यू-टर्न: अमेरिकी पायलट के लिए इनाम, पहले किया था इनकार।

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, ईरान ने पहले विमान दुर्घटना के बाद एक अमेरिकी पायलट को पकड़ने का दावा किया, लेकिन अब उसकी गिरफ्तारी के लिए इनाम की पेशकश कर रहा है। अमेरिका ने प्रतिक्रिया नहीं दी है। ईरान पायलट का इस्तेमाल सौदेबाजी के लिए कर सकता है।

Web Title : Iran's U-turn: Pilot reward after denial in US-Iran tension.

Web Summary : Amid US-Iran tensions, Iran initially claimed capture of an American pilot after a plane crash but now offers a reward for his capture. The US hasn't reacted. Iran could use the pilot for negotiation leverage.