US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:10 IST2026-04-04T17:07:04+5:302026-04-04T17:10:38+5:30

US Israel Iran War : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने आपल्या बंदरांसाठी अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या जहाजांना सामुद्रधुनीतून जाण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे आवश्यक आहे, त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाईल.

US Israel Iran War Iran's big decision, poking America's nose! Now these ships are allowed to pass through the 'Strait of Hormuz' | US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी

US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी

US Israel Iran War : मागील एक महिन्यापासून इराणने पूर्णपणे बंद केलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आता जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी खुली करण्याचा निर्णय तेहरान सरकारने घेतला आहे. इराणची वृत्तसंस्था 'तस्निम'ने दिलेल्या माहितीनुसार, औषधे आणि अन्नधान्य यांसारख्या वस्तू घेऊन येणाऱ्या जहाजांना आता या मार्गावरून प्रवासाची मुभा असणार आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांमुळे इराणमध्येही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी इराणने आपली भूमिका मवाळ केली असली, तरी हा प्रवेश विनाअट नाही. या निर्णयाचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर आणि अडकून पडलेल्या हजारो जहाजांवर होणार आहे.

इराण सरकारने दिली परवानगी

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यापासून तेहरानने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली आहे. त्या दिवसापासून, इराणने केवळ अशाच जहाजांना या सागरी मार्गातून जाण्याची परवानगी दिली आहे, ही इराणी सरकारची सहयोगी आहेत किंवा युद्धात तटस्थ आहेत. युरोपमधील देशांसह अमेरिकेच्या अनेक सहयोगी देशांची जहाजे अजूनही सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंना अडकून पडली आहेत. अहवालानुसार, या बंदीमुळे २,००० हून अधिक जहाजांवर परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यात, भारत सरकारने अंदाजे सहा जहाजे बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. सामुद्रधुनीच्या आसपास अजूनही डझनभर जहाजे अडकून पडली आहेत.

काही दिवसांतच इराणमध्ये सत्तापालटाचे स्वप्न पाहणारे अमेरिका आणि इस्रायल आता युद्धात अडकले आहेत. इराणच्या हलक्या ड्रोन्सनी संपूर्ण आखाती प्रदेशाला या संघर्षात ढकलले आहे. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडली आहेत. 

Web Title : ईरान ने संघर्ष के बीच आवश्यक आपूर्ति के लिए होर्मुज जलडमरूमध्य नाकाबंदी हटाई।

Web Summary : ईरान ने आंशिक रूप से होर्मुज जलडमरूमध्य को दवा और भोजन जैसी आवश्यक वस्तुओं वाले जहाजों के लिए फिर से खोल दिया। अमेरिका-इजरायल की कार्रवाइयों के बाद, इस निर्णय का उद्देश्य कमी को कम करना है, लेकिन पहुंच सशर्त बनी हुई है। वैश्विक तेल आपूर्ति और हजारों फंसे जहाजों पर असर पड़ेगा।

Web Title : Iran eases Hormuz Strait blockade for essential supplies amid conflict.

Web Summary : Iran partially reopens the Strait of Hormuz for ships carrying essential goods like medicine and food. This decision, following US-Israel actions, aims to alleviate shortages, but access remains conditional. Global oil supply and thousands of stranded ships will be impacted.