इराण युद्धावर उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार; चीन-पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:53 IST2026-04-01T17:52:48+5:302026-04-01T17:53:44+5:30

हा प्रस्ताव केवळ युद्ध टाळण्याचाच नव्हे तर त्याचे परिणाम कमी करण्याचाही प्रयत्न करतो हे या प्रस्तावाचे वैशिष्ट्य आहे

US Israel Iran War: Donald Trump will make a big announcement on Iran war tomorrow morning; Will China-Pakistan's proposal be accepted? | इराण युद्धावर उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार; चीन-पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य होणार?

इराण युद्धावर उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार; चीन-पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य होणार?

वॉशिंग्टन -  अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. २ एप्रिलला सकाळी ६.३० वाजता ते देशाला संबोधित करतील. इराणसोबत सुरू असलेले युद्ध पाचव्या आठवड्यातही सुरू आहे. हे युद्ध कधी आणि कसं संपेल हा प्रश्न आहे. या युद्धात प्रत्येक दिवशी संघर्ष आणखी चिघळत आहे. या युद्धामुळे आखाती देशांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नेमके काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

चीन आणि पाकिस्तानने ५ कलमी शांतता प्रस्ताव सादर केला आहे. बीजिंगमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर समोर आलेला हा प्लॅन प्रथमदर्शनी थेट आणि संतुलित वाटतो. त्यात सर्वात आधी कुठल्याही अटींशिवाय युद्धविरामाची शक्यता आहे जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडू नये. त्याशिवाय सर्व संबंधित देश पुन्हा एकत्रित टेबलावर बसतील आणि विना सैन्य दबावातून समस्येवर मार्ग शोधतील असं सांगण्यात आले आहे.

हा प्रस्ताव केवळ युद्ध टाळण्याचाच नव्हे तर त्याचे परिणाम कमी करण्याचाही प्रयत्न करतो हे या प्रस्तावाचे वैशिष्ट्य आहे. त्यात नागरिकांचे आणि वीज प्रकल्प, जलप्रकल्प व अणुऊर्जा प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्यावर भर देतो तसेच जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा कणा असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करण्याबाबतही प्रस्तावात उल्लेख आहे. एक स्थायी शांतता आराखडा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची भूमिका अधिक मजबूत करण्याचे आवाहनही या प्रस्तावात करण्यात आले आहे. हा प्रस्ताव वरवर पाहता जितका संतुलित वाटतो, तितकीच त्याची अंमलबजावणी अवघड आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण या सर्वांच्या स्वतःच्या अटी आणि प्राधान्यक्रम आहेत, जे एकमेकांपेक्षा वेगळी आहेत.

युद्ध संपण्यासाठी इराणची अट काय?

कुठल्याही चर्चेच्या आधी हल्ले आणि टार्गेट किलिंग पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती बनू नये यासाठी जागतिक पातळीवर हमी हवी. युद्धात झालेली नुकसान भरपाई आणि संपूर्ण प्रदेशात संघर्ष संपवण्यासाठी मागणी इराणने ठेवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्ट्रेट होर्मुझ यावरील नियंत्रणासाठी इराणला जागतिक मान्यता हवी. 

युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचा कठोर प्रस्ताव

युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या १५-कलमी प्रस्तावानुसार इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख अणु ठिकाणे बंद करणे, युरेनियम संवर्धन थांबवणे आणि सध्याचा साठा आंतरराष्ट्रीय संस्थांकडे सुपूर्द करणे यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवण्याची आणि प्रादेशिक गटांना दिला जाणारा पाठिंबा बंद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या बदल्यात अमेरिकेने निर्बंधांमध्ये सूट देण्याचे आणि शांततापूर्ण अणुऊर्जेमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु इराणने या अटी एकतर्फी असल्याचे सांगत त्या फेटाळून लावल्या आहेत.

दरम्यान, यामुळेच युद्धविरामाचा मार्ग अजूनही खडतर वाटतो. चीन-पाकिस्तान प्रस्ताव निश्चितपणे वाटाघाटींसाठी एक मार्ग दाखवतो परंतु विश्वासाचा अभाव आणि अटी ही खरी आव्हाने आहेत. जोपर्यंत दोन्ही बाजू आपली भूमिका नरम करत नाहीत तोपर्यंत ठोस कराराची आशा कमी आहे.
 

Web Title : ईरान युद्ध पर ट्रम्प का बड़ा एलान; क्या चीन-पाक प्रस्ताव होगा मंज़ूर?

Web Summary : ईरान युद्ध पर ट्रम्प राष्ट्र को संबोधित करेंगे। चीन और पाकिस्तान ने शांति प्रस्ताव रखा, पर परमाणु कार्यक्रमों और क्षेत्रीय प्रभाव को लेकर अमेरिका और ईरान की अलग-अलग मांगें हैं, जिससे युद्धविराम में बाधा आ रही है।

Web Title : Trump to announce Iran war decision; China-Pakistan peace proposal?

Web Summary : Trump to address the nation on the Iran war. China and Pakistan propose a peace plan, but US and Iran have conflicting demands regarding nuclear programs and regional influence, hindering ceasefire efforts.