इराण आणि अमेरिकेतील युद्ध आणखी भजकले आहे. दरम्यान, आता इराणच्या अल्बोर्झ प्रांतातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. जवळजवळ पूर्ण झालेल्या B1 पुलाचे अमेरिकी-इस्रायली हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
गेल्या दीड वर्षापासून मध्य-पूर्वेत अशांतता पसरली आहे. इस्रायल-हमास युद्ध ऑक्टोबर २०२३ मध्ये गाझामध्ये सुरू झाले आणि हळूहळू संपूर्ण प्रदेशात पसरले. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर हल्ला केला, येमेनच्या हौथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील जलवाहतूक रोखण्यास सुरुवात केली आहे आणि इराण व इस्रायल यांच्यात थेट क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत. या संघर्षात इराणची प्रमुख भूमिका आहे. हमास, हिजबुल्लाह आणि हौथी या सर्वांना इराणचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे इराण एक लक्ष्य आहे.
पश्चिम आशियातील सर्वात मोठा पूल
इराणच्या उत्तरेकडील कराज येथे असलेला B1 पूल हा मध्य पूर्वेतील सर्वात मोठा पूल होणार होता, असे म्हटले जाते. यासाठी अंदाजे ४०० मिलियन अमेरिकी डॉलर्स, म्हणजेच ३७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला होता. हा पूल १,०५० मीटर लांब असून त्यात आठ गाळे आहेत, यामध्ये १७६ मीटर लांबीचा एक गाळा आणि १३६ मीटर उंच खांबांचा समावेश आहे.
इराणच्या प्रेस टीव्ही या वृत्तवाहिनीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितले की, बांधकाम सुरू असलेल्या बी१ पुलावर हल्ला झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
हे युद्ध आता केवळ सैनिक आणि शस्त्रास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. रस्ते, वीज प्रकल्प, पूल, देशाचा कारभार चालवणारी प्रत्येक गोष्ट देखील हल्ल्याच्या छायेत आहे.
Web Summary : A US-Israeli airstrike reportedly damaged the nearly completed B1 bridge in Iran, disrupting power. The bridge, a major infrastructure project in West Asia, cost over $400 million. Tensions escalate amidst ongoing regional conflict involving Israel, Hamas, Hezbollah, and Houthi rebels, fueled by Iranian support.
Web Summary : ईरान में अमेरिकी-इजरायली हवाई हमले में बी1 पुल क्षतिग्रस्त हो गया, जिससे बिजली आपूर्ति बाधित हुई। यह पुल पश्चिमी एशिया की एक प्रमुख परियोजना थी, जिस पर 400 मिलियन डॉलर से अधिक खर्च आया। इजरायल, हमास, हिजबुल्लाह और हौथी विद्रोहियों के बीच तनाव बढ़ रहा है, जिसे ईरानी समर्थन मिल रहा है।