"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:48 IST2026-04-05T16:32:58+5:302026-04-05T16:48:13+5:30

US Israel Iran War : इराणच्या झिम्बाब्वेमधील दूतावासाने एक्स वरील एका पोस्टद्वारे अमेरिकेवर टीका केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी लिहिले, "नम्र राहा आणि पुढे चला."

US Israel Iran War Be humble and...", Iran itself suggested a solution to the Hormuz crisis; warned America | "विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा

"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा

US Israel Iran War  : इराण आणि अमेरिकेतील युद्धात आता 'सोशल मीडिया'वरही कलगीतुरा रंगला आहे. झिम्बाब्वे आणि प्रिटोरियामधील इराणी दूतावासाने 'एक्स'वर केलेल्या पोस्टमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सामुद्रधुनी उघडण्याचे आश्वासन देऊनही, इराणने मात्र "केवळ नम्र राहणाऱ्यांनाच प्रवेश" असे म्हणत आपली पकड अधिक घट्ट केली आहे.

हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने जगभरात तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच इराण आता या मार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांवर 'टोल प्रणाली' लागू करण्याच्या विचारात आहे. यामुळे भविष्यात या सागरी मार्गावरून प्रवास करणे अधिक महाग आणि इराणच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे.

४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?

इराणची सोशल मीडियावरुन टीका 

प्रिटोरियातील इराणी दूतावासाने अमेरिकन ध्वजाने झाकलेल्या शवपेट्यांचा फोटो पोस्ट करत, "हॉर्मुझमधून जाऊ शकणारी एकमेव अमेरिकन गोष्ट," असे म्हणत खळबळ उडाली आहे.  इराणने स्पष्ट केले आहे की, जे देश शांततेने वाटाघाटी करतील आणि इराणचे मित्र असतील त्यांनाच या मार्गावरून जाण्याची मुभा दिली जात आहे.

फ्रेंच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी CMA CGM चे एक जहाज या सामुद्रधुनीतून जाणारे पहिले पश्चिम युरोपीय जहाज ठरले आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युद्धविरामाचे आवाहन करून त्यावर आग्रह धरल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे. भारतानेही तेहरानसोबतचे आपले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करत, या मार्गातून जहाजांच्या वाहतुकीला सुविधा दिली आहे. २८ फेब्रुवारीपासून भारताशी संबंधित किमान आठ जहाजांनी या सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे.

तसेच इराण सध्याच्या संघर्षाच्या पलीकडे पाहत आहे. तेहरान या सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या जहाजांसाठी टोल प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे. 

Web Title : होर्मुज जलसंधि पर ईरान का उपाय: विनम्रता ज़रूरी, अमेरिका को चेतावनी

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, ईरान ने होर्मुज जलसंधि पर नियंत्रण जताया। ईरान जहाजों पर टोल लगा सकता है, मित्र राष्ट्रों को तरजीह देगा। कुछ यूरोपीय जहाज पहले ही गुजर चुके हैं। भारत ने ईरान के साथ मैत्रीपूर्ण संबंध बनाए रखे हैं।

Web Title : Iran's Hormuz Strait Solution: Humility Required, Warning to US

Web Summary : Amidst US-Iran tensions, Iran asserts control over the Hormuz Strait. Iran may impose tolls on ships, favoring friendly nations. Some European ships have already passed through. India maintains friendly relations with Iran, facilitating its ship's passage.