"अटी मान्य करा नाहीतर विनाशाला तयार रहा", ट्रम्प यांचा 'रुद्रावतार'; शस्त्रसंधीसाठी इराणसमोर कोणता प्रस्ताव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:08 IST2026-04-01T19:05:32+5:302026-04-01T19:08:25+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणचे नवीन अध्यक्ष जे त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान आहेत त्यांनी अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे, असे लिहिले आहे.

"अटी मान्य करा नाहीतर विनाशाला तयार रहा", ट्रम्प यांचा 'रुद्रावतार'; शस्त्रसंधीसाठी इराणसमोर कोणता प्रस्ताव?
पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला असून, "इराणला पुन्हा पाषाण युगात धाडू," अशा शब्दांत विनाशाची धमकी दिली आहे. इराणच्या नवीन अध्यक्षांनी केलेली युद्धविरामाची विनंती ट्रम्प यांनी धुडकावून लावत, कडक अटी समोर ठेवल्या आहेत. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणचे नवीन अध्यक्ष जे त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान आहेत त्यांनी अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे, असे लिहिले आहे.
"जोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली, मुक्त आणि सुरक्षित होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही युद्धविरामाचा विचार करणार नाही," असे ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जोपर्यंत अटी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत इराणवर हल्ले सुरूच राहतील. "आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू किंवा त्यांना पुन्हा पाषाण युगात पाठवू," असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
काय आहे 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'चे महत्त्व?
हॉर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग आहे. या मार्गावर इराणचे नियंत्रण असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होतो. ट्रम्प यांनी हा मार्ग खुला करण्याची युद्धविरामाची पहिली अट टाकली आहे.
US President Donald Trump posts o Truth Social, "Iran’s New Regime President, much less Radicalized and far more intelligent than his predecessors, has just asked the United States of America for a CEASEFIRE! We will consider when the Hormuz Strait is open, free, and clear. Until… pic.twitter.com/LOi4mAdXCh
— ANI (@ANI) April 1, 2026