अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:44 IST2026-04-12T11:42:25+5:302026-04-12T11:44:23+5:30

महत्वाचे म्हणजे, चर्चा फिस्कटल्यानंतर व्हॅन्स इराणला कोणतीही पूर्वसूचना न देताच तडकाफडकी वॉशिंग्टनला रवाना झाले. यानंतर, आता पाकिस्तानने दोन्ही देशांकडे एक नवी मागणी केली आहे.

US-Iran talks fizzled out What were America's main demands Now Pakistan has made new demands to both | अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी

अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानात झालेली शांतता चर्चा अखेर काही मुद्द्यांवरून फिस्कटली. यासाठी इराणने अमेरिकेलाच जबाबदार धरले. अमेरिकेच्या मागण्या अवास्तव होत्या असे म्हणत, चर्चा निष्फळ ठरल्याचे खापर इराणने अमेरिकेवरच फोडले. तर यासंदर्भात घोषणा करताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी  इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला, असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, चर्चा फिस्कटल्यानंतर व्हॅन्स इराणला कोणतीही पूर्वसूचना न देताच तडकाफडकी वॉशिंग्टनला रवाना झाले. यानंतर, आता पाकिस्तानने दोन्ही देशांकडे एक नवी मागणी केली आहे.

पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी -
पाकिस्तानी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांनी १४ दिवसांच्या युद्धविरामाची (सीझफायर) मुदत वाढवावी, अशी विनंती पाकिस्तानने केली आहे. आता पाकिस्तानच्या या मागणीला इराण आणि अमेरिका कसा प्रतिसाद देतात? पाकिस्तानची ही मागणी हे दोन्ही देश स्वीकारतात की नाही? हे बघावे लागेल. दोन्ही देशांमध्ये सध्या 14 दिवसांच्या युद्धविरामावर सहमती झाली आहे.

अमेरिकेच्या प्रमुख मागण्या -
माध्यमांतील वृत्तानुसार, अमेरिकेने इराणला युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली आहे. यात देशातील सुमारे ९०० पाउंड युरेनियमचा साठा देशाबाहेर पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिवाय, अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन स्वतःच्या अटींवर करायचे आहे. अशा अटींमुळे ही चर्चा फिस्कटल्याचे समजते.

महत्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा मोठा फटका पाकिस्तानच्या प्रतिमेला बसला आहे. या प्रक्रियेचे नेतृत्व करणारे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आवडते 'फील्ड मार्शल' मानले जातात. त्यांच्या नेतृत्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

 

Web Title : अमेरिका-ईरान वार्ता विफल; अमेरिकी मांगें और पाकिस्तान का नया अनुरोध।

Web Summary : पाकिस्तान में अमेरिका-ईरान वार्ता अमेरिकी मांगों पर विफल रही। पाकिस्तान ने युद्धविराम बढ़ाने का आग्रह किया। अमेरिका चाहता था कि ईरान यूरेनियम संवर्धन रोके और होर्मुज जलडमरूमध्य को नियंत्रित करे। विफलता पाकिस्तान की छवि को प्रभावित करती है।

Web Title : US-Iran talks fail; US demands and Pakistan's new request.

Web Summary : US-Iran talks in Pakistan collapsed over US demands. Pakistan urges a ceasefire extension. US wanted Iran to halt uranium enrichment and control the Strait of Hormuz. The failure impacts Pakistan's image.