पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:20 IST2026-04-10T15:19:23+5:302026-04-10T15:20:30+5:30

पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या हस्ते ११ मार्च २००२ रोजी या हॉटेलचे उद्घाटन झाले  होते. या हॉटेलची मालकी 'आगा खान फंड ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट'कडे आहे.

US-Iran delegation to stay at this luxurious Serena Hotel in Pakistan, know the cost of one night | पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल

पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल

मध्यपूर्वेतील युद्धानंतर, आता अमेरिका आणि इराण चर्चेच्या टेबलावर येत आहेत. या महत्त्वाच्या वाटाघाटींसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील आलिशान 'सेरेना हॉटेल'ची निवड करण्यात आली आहे. हे हॉटेल केवळ निवासाचेच ठिकाण नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील हाय-प्रोफाइल बैठकांचे प्रमुख केंद्र मानले जाते.

पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या हस्ते ११ मार्च २००२ रोजी या हॉटेलचे उद्घाटन झाले  होते. या हॉटेलची मालकी 'आगा खान फंड ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट'कडे आहे. या हॉटेलच्या भाड्याचा विचार करता, एका रात्रीसाठी डिलक्स रूमचे भाडे १३ हजार रुपयांपासून (१४३ डॉलर) सुरुवात होते, तर एक्झिक्युटिव्ह रूमसाठी २३ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सर्वात महागड्या 'प्रेसिडेंशियल सुइट'चे भाडे एका रात्रीसाठी सुमारे ९३ हजार रुपये (१००० डॉलर) एवढे आहे.

प्रसिद्ध वास्तुविशारद नय्यर अली दादा यांनी डिझाइन केलेल्या या हॉटेलमध्ये मुघल आणि मूरिश शैलीचा संगम बघायला मिळतो. १४ एकरवर पसरलेल्या या वास्तूमध्ये एकूण ३८७ खोल्या असून त्यात ५२ सुइट्स आहेत. मार्गल्ला हिल्स आणि रावल तलावाचा नयनरम्य नजारा हे या हॉटेलचे मुख्य आकर्षण आहे. यांची डिलक्स, एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह,आणि प्रेसिडेंशियल सुइट्स अशा श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. 

प्रत्येक खोली मिनीबार, किंग किंवा क्वीन-साईज बेड आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे पाहुण्यांना एक आलिशान अनुभव मिळतो. हॉटेलमध्ये रकापोशी, जमाना, दावत, बरदरी, अल मगरीब आणि वाइल्ड राइस यांसारखी अनेक रेस्टॉरंट्स देखील आहेत, जिथे पाकिस्तानी, आशियाई, मध्य-पूर्वेकडील आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळतात. येथे एक कॉफी शॉप, स्विमिंग पूल, बाग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोकळी जागा देखील आहे.

कमाईचा विचार करता, हे हॉटेल पाकिस्तानात आघाडीवर आहे. २०२५ च्या पहिल्या ९ महिन्यांतच याची कमाई ११ अब्ज पाकिस्तानी रुपयांवर पोहोचली होती. अशा जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांमुळेच अमेरिका-इराणमधील महत्त्वाच्या चर्चेसाठी या ठिकाणाला पसंती देण्यात आली आहे.

इस्लामाबाद सेरेना हॉटेल भाडे, अमेरिका इराण चर्चा पाकिस्तान, सेरेना हॉटेल सुविधा, इस्लामाबाद लक्झरी हॉटेल, Islamabad Serena Hotel room rates, US Iran talks Pakistan, Serena Hotel presidential suite price, Luxury hotels in Islamabad.

Web Title : पाकिस्तान के सेरेना होटल में ठहरेंगे अमेरिकी-ईरानी प्रतिनिधिमंडल।

Web Summary : अमेरिका और ईरानी प्रतिनिधिमंडल इस्लामाबाद के सेरेना होटल में वार्ता करेंगे। 2002 में उद्घाटन किया गया, होटल $143 से $1000 प्रति रात के कमरे प्रदान करता है। इसमें मुगल-मूरिश डिजाइन, विभिन्न रेस्तरां हैं, और यह पाकिस्तान में एक प्रमुख राजस्व जनरेटर है।

Web Title : US-Iran Delegates to Stay at Serena Hotel in Pakistan.

Web Summary : US and Iranian delegations will meet in Islamabad's Serena Hotel for talks. The hotel, inaugurated in 2002, offers rooms from $143 to $1000 per night. It boasts Mughal-Moorish design, diverse restaurants, and is a leading revenue generator in Pakistan.