इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणकडून नाकेबंदी करण्यात आल्याने जगभरातील तेल पुरवठा बाधित झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ३० दिवसांपर्यंत रशियाकडून खनिज तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात अमेरिकेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच भारताला दिलेली ही सवलत तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेमधील विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी केली आहे.
कॅलिफोर्नियामधील प्रतिनिधी सॅम लिकार्डो आणि अॅरिझोना येथील सिनेटर रुबेन गालेगो यांनी ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे. रशियन तेल खरेदी करण्यासाठी भारताला ३० दिवसांची सवलत देण्याचा तुम्ही घेतलेला निर्णय हा धोकादायक आणि आत्मघातकी आहे. तसेच तुम्ही याला कुठल्याही पद्धतीने न्यायोचित ठरवू शकत नाही. ही सवलत शत्रूला थेट फायदा पोहोचवण्यासारखी आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठीच्या निर्बंधांबाबत ३० दिवसांची सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जहाजांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला होता.
Web Summary : US faces opposition over Trump's decision to allow India to buy Russian oil due to Iran tensions. Critics call it dangerous and aiding the enemy, demanding immediate revocation of the 30-day waiver granted amidst disrupted oil supplies.
Web Summary : ईरान तनाव के बीच भारत को रूसी तेल खरीदने की छूट पर अमेरिका में विरोध है। आलोचकों ने इसे खतरनाक बताते हुए छूट रद्द करने की मांग की। अमेरिका ने तेल आपूर्ति बनाए रखने के लिए यह छूट दी थी।