नकोसा विक्रम: जगात सर्वाधिक अपघाती मृत्यू भारतात, विकसित देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 11:13 IST2023-01-20T11:07:20+5:302023-01-20T11:13:53+5:30
अमेरिकेत अपघात जास्त पण तुलनेने बळींची संख्या कमीच

नकोसा विक्रम: जगात सर्वाधिक अपघाती मृत्यू भारतात, विकसित देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी
चंद्रकांत दडस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जगभरात सर्वाधिक रस्ते अपघात होण्याचे प्रमाण अमेरिकेत असले तरी अपघातांमध्ये मृत्यू होण्याची संख्या भारतामध्ये सर्वाधिक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे. इंटरनॅशनल रोड फेडरेशन जिनिव्हाने प्रकाशित केलेल्या अहवालाचा आधार घेत रस्ते वाहतूक मंत्रालयाने ही आकडेवारी सादर केली आहे. यासाठी जगातील २०७ देशांमधील रस्ते अपघातांचा डेटा एकत्रित करण्यात आला आहे.
सर्वाधिक जखमी कुठे?
- रस्ते अपघातात सर्वाधिक जखमी होण्याचे प्रमाण अमेरिकेत असून, तेथे तब्बल २७ लाख १० हजार जण अपघातांमुळे जखमी झाले आहेत.
- हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. अमेरिकेत प्रवासी जखमी झाला तरी त्याच्यावर तत्काळ उपचार झाल्यामुळे किमान त्याचा मृत्यू होत नाही. गंभीर अपघात होऊनही येथे मृत्यूंचे प्रमाण कमी दिसते. भारतात जखमींचे प्रमाण ४.६९ लाख इतके असून, यात तो दुसऱ्या स्थानावर आहे.
एक लाख लोकसंख्येमागे...
देश अपघात मृत्यू
- अमेरिका - ५९० - ११
- भारत - ३२ - ११
- जपान - ३४० - ३
- इराण - ४१३ - २०
- जर्मनी - ३७२ - ४
- चीन - १८ - ५
- ब्रिटन - १८४ - ३
- स्पेन - २१९ - ४
- द.आफ्रिका - २५४ - २६
रस्ते अपघात रॅंक मृत्यू रॅंक
- १९,२७,६५४ १ ३६,५६० ३
- ४,३२,९५७ २ १,५१,४१७ १
- ४,३०,६०१ ३ ४,१६६ १०
- ३,३७,८९१ ४ १६,५४० ६
- ३,२०,३१५ ५ १,४९३ १९
- ३,०८,७२१ ६ ३,२७५ १४
- २,४४,९३७ ७ ६३,१९४ २