शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेत अभूतपूर्व मतदान, राजपाक्षेंची कठीण परीक्षा

By admin | Updated: January 9, 2015 02:14 IST

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीसाठी नागरिकांनी गुरुवारी मोठ्या संख्येने मतदान केले.

कोलंबो : श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीसाठी नागरिकांनी गुरुवारी मोठ्या संख्येने मतदान केले. तिसऱ्यांदा सत्तारूढ होऊ इच्छिणारे विद्यमान राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे आणि त्यांचेच एकेकाळचे मित्र असलेले मैत्रीपाला सिरीसेना रिंगणात आहेत. मुस्लिम व तामिळबहुल भागात मतदानाचे प्रमाण विलक्षण राहिले. त्यामुळे निवडणूक राजपाक्षेंसाठी कठीण बनल्याचे बोलले जात आहे. मतदानाच्या पहिल्या सात तासांत बहुतांश भागात ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मतदानादरम्यान कोणत्याही हिंसाचाराचे वृत्त नसले तरी खासगी निगराणी संघटना कॅम्पेन फॉर फ्री अ‍ॅण्ड फेअर इलेक्शन्सने काही मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगितले. दुपारी चार वाजता मतदान संपले. टपाल मतदानाचा निकाल आज रात्री दहा वाजता आम्ही जाहीर करू शकू, अशी आम्हाला आशा आहे, असे निवडणूक आयुक्त महिंदा देशप्रिया यांनी सांगितले. देशाच्या २१ दशलक्ष लोकसंख्येपैकी एक कोटी ५८ लाख ६ हजार ५९८ पात्र मतदार आहेत. मतदानासाठी १,०७६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. निवडणूक रिंगणात १९ उमेदवार असले तरी मुख्य लढत राजपाक्षे आणि सिरीसेना यांच्यातच होती. देशभरात मतदाराच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या, असे कॅम्पेन फॉर फ्री अ‍ॅण्ड फेअर इलेक्शन्सच्या कीर्ती तेन्नाकून यांनी सांगितले. राजपाक्षे यांनी आपणच सत्तेत परतू असा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)