शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

अमेरिकेची आणखी एक चांद्र मोहीम, चंद्रावर जाणारी पहिली महिला असेल अमेरिकन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 4:29 AM

अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले.

वॉशिंग्टन : अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले.देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून येत्या पाच वर्षांत अमेरिका चंद्रावर परत जाईल आणि त्यावर पाऊल टाकणारी पहिली महिला व पुढील पुरुष अमेरिकेचा असेल, असे पेन्स यांनी येथे सॅटेलाईट २०१९ परिषदेत बोलताना सांगितले. ते म्हणाले, हे वर्ष संपायच्या आधी आम्ही अमेरिकेच्या अग्निबाणांवर अमेरिकन भूमीतून अमेरिकन अंतराळवीरांना अनंत पसरलेल्या अंतराळात पाठवणार आहोत याचा ट्रम्प प्रशासनाला आनंद होत आहे.

अंतराळातील गूढ आणि रहस्ये पूर्णपणे उलगडण्यासाठी माहिती व मार्गदर्शन मिळावे म्हणून ट्रम्प यांनी अमेरिकन सरकारच्या कार्यालयांबाहेर, नासाच्या पलीकडे बघितले पाहिजे हे मान्य केले आहे. याच कारणामुळे आम्ही नॅशनल स्पेस कौन्सिलमध्ये युझर्स अ‍ॅडव्हायझरीज ग्रुपला एकत्र केले आहे. मला सांगायला अभिमान वाटतो आहे की, अंतराळातील नवनवीन गोष्टी शोधण्यास गती देण्यासाठी देशातील अत्यंत बुद्धिमान व हुशार लोकांना एकत्र आणले आहे, असे माईक पेन्स म्हणाले.

भारतासह १०५ देशांतील प्रतिनिधी हजरभारतासह १०५ देशांतील १५ हजारांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि उद्योगांचे प्रतिनिधी सहा मेपासून वॉशिंग्टन डीसीमध्ये सुरू झालेल्या चार दिवसांच्या या परिषदेला उपस्थित आहेत. ही परिषद सगळ्यात मोठी अशी उपग्रह उद्योग घटना असल्याचे सांगण्यात येते. परिषदेत अ‍ॅमेझॉन आणि ब्लू ओरिजिनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस, स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, वन वेबचे संस्थापक गे्रग वायलर आदींची मुख्य भाषणे झाली.

टॅग्स :NASAनासाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ