अनोखी प्रेमकहाणीः घटस्फोटाच्या 50 वर्षांनंतर हे जोडपं पुन्हा करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 17:02 IST2018-04-03T17:02:30+5:302018-04-03T17:02:30+5:30

अमेरिकेत केंटकी इथे राहणा-या 83 वर्षीय हेरॉल्ड हॉलंड हे पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे ते दुस-या तिस-या कोणी नव्हे, तर घटस्फोट दिलेली स्वतःची पहिली पत्नी राहिलेल्या लिलियन बार्न्सशीच लग्न करणार आहे.

Unique Premchahani: After 50 years of divorce, the couple will be married again | अनोखी प्रेमकहाणीः घटस्फोटाच्या 50 वर्षांनंतर हे जोडपं पुन्हा करणार लग्न

अनोखी प्रेमकहाणीः घटस्फोटाच्या 50 वर्षांनंतर हे जोडपं पुन्हा करणार लग्न

केंटकी- अमेरिकेत केंटकी इथे राहणा-या 83 वर्षीय हेरॉल्ड हॉलंड हे पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे ते दुस-या तिस-या कोणी नव्हे, तर घटस्फोट दिलेली स्वतःची पहिली पत्नी राहिलेल्या लिलियन बार्न्सशीच लग्न करणार आहे. या जोडप्यानं 50 वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला होता. आता या महिन्याच्या अखेरीस ते दोघे लग्न करणार आहेत.

50 वर्षांपूर्वी ख्रिसमसच्या दरम्यान त्यांनी लग्न केलं होतं. दोघांनाही घटस्फोटाच्या आधीच पाच मुलं झाली होती. परंतु 1968ला दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले. हॉलंड म्हणाले, माझ्या कामामुळे मी माझ्या कुटुंबीयांपासून लांब राहिलो होतो. त्यामुळेच आमचा घटस्फोट झाला होता. त्यात पूर्णतः माझी चूक होती.

दरम्यान, कालांतरानं या दोघांनी दुसरं लग्न केलं. परंतु दोघांचेही जोडीदार 2015ला त्यांची साथ सोडून स्वर्गवासी झाले. त्यानंतर हॉलंड आणि बार्न्स हे एक-दुस-यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहिले. तसेच मी बार्न्सला तिची इच्छा असेल तिकडे घेऊन जाईन, असंही एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. हे जोडपं 14 एप्रिलला पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहे. 

Web Title: Unique Premchahani: After 50 years of divorce, the couple will be married again

टॅग्स :marriageलग्न