युक्रेनच्या विमानाचं काबूलमध्ये अपहरण, विमान इराणच्या दिशेनं नेल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:18 IST2021-08-24T14:17:08+5:302021-08-24T14:18:39+5:30
Ukrainian Plane Hijacked: विमानात किती लोक होते आणि ते कोणी हायजॅक केलं याची माहित मिळू शकली नाही.

युक्रेनच्या विमानाचं काबूलमध्ये अपहरण, विमान इराणच्या दिशेनं नेल्याची माहिती
काबूल:अफगाणिस्तानमध्येतालिबाननं ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. दरम्यान, युक्रेनच्या एका विमानाचं काबूलमध्ये अपहरण करुन इराणला नेल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी ही माहिती दिली आणि सांगितलं की, युक्रेनियन विमान आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काबूलला पोहोचलं होतं, पण अज्ञात लोकांनी हायजॅक करुन इराणला नेलं.
हायजॅक करुन इराणला नेलं विमान
युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन म्हणाले, 'युक्रेनियन नागरिकांना अफगाणिस्तानातून आपल्या देशात आणण्यासाठी एक विमान काबूलला पोहोचलं होतं. पण, अज्ञात लोकांनी हे विमान हायजॅक करुन ते इराणला नेलं. युक्रेनियन विमानाचं रविवारी अपहरण करण्यात आलं होतं आणि मंगळवारी हे विमान इराणला नेण्यात आल. दरम्यान, विमान कुणी हायजॅक केलं, याची माहिती मिळू शकली नाही.
83 लोक युक्रेनला पोहोचले
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत एकूण 83 लोकांना काबूलमधून युक्रेनची राजधानी कीवमध्ये आणण्यात आलं आहे. यात 31 युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. तसेच, 12 युक्रेनियन लष्करी कर्मचारी घरी परतले असून, परदेशी पत्रकार आणि मदतीची विनंती करणाऱ्या सार्वजनिक व्यक्तींनाही बाहेर काढण्यात आलं आहे.