Russia Ukraine War: मोठी बातमी! रशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार; युद्ध थांबविण्यास पुतीन तयार, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:30 IST2022-03-03T16:29:27+5:302022-03-03T16:30:23+5:30
Ukraine-Russia War: युक्रेनविरुद्ध सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी मॉस्को चर्चा करण्यास तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. चर्चेची दुसरी फेरी सुरु झाली आहे.

Russia Ukraine War: मोठी बातमी! रशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार; युद्ध थांबविण्यास पुतीन तयार, पण...
युक्रेनवर हल्ले सुरु करण्याच्या घटनेस आता आठ दिवस लोटले आहेत. या आठ दिवसांत रशियाला जबर नुकसान सहन करावे लागले असून युक्रेनच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच रशियन सैन्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. युक्रेनमध्य़े सैन्य़ाचे नेतृत्व करण्यासाठी गेलेल्या मेजर जनरलचा मृत्यू झाला आहे.
रशियाचे मेजर जनरल आंद्रेई सुखोवत्स्की यांचा युक्रेनने केलेल्या प्रत्युत्तरात मृत्यू झालाचा दावा न्यूज एजन्सी NEXTA ने केला आहे. तसेच युक्रेनने रशियन सैन्याला जोरदार नुकसान पोहोचविल्याचा दावाही करण्यात आला आहे. KyivPost नुसार युद्धाच्या आठव्या दिवशी रशियाची ३० लढाऊ विमाने, 374 ऑटो मोबाइल्स टेक्निक्स, 42 MLRS, 900 AFV, ३१ हेलिकॉप्टर, 90 आर्टिलेरियन सिस्टम, 2 कटर, 217 टैंक, 11 एंटीएयर डिफेंस, 3 यूएवी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत ९००० रशियन सैनिकांना मारल्याचा दावा देखील केला आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे दहा लाखांहून युक्रेनी नागरिकांनी पलायन केले आहे तर २२७ लोक मारले गेल्याचे युएनने म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी दुपारी तीन वाजता सुरू होईल, असे रशियन शिष्टमंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची दुसरी फेरी बेलारूसच्या ओब्लास्टमध्ये होणार आहे. रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख व्लादिमीर मेडिन्स्की यांनी सांगितले की, आम्ही युक्रेनच्या रशियन शिष्टमंडळाच्या शिष्टमंडळाची वाट पाहत आहोत. दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी रशियाचे शिष्टमंडळ बुधवारी बेलारूसला पोहोचले होते.
युक्रेनविरुद्ध सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी मॉस्को चर्चा करण्यास तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. रशिया युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवणार नाही, असेही लव्हरोव्ह यांनी म्हटले आहे.