शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

दोन वर्ष झाली... रशियाशी युद्ध संपेना; अखेर युक्रेनच्या सैन्याकडून घेण्यात आला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 9:00 AM

Russia Ukraine War: दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता भासल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Russia Ukraine War, Volodymyr Zelenskyy : युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळ युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता भासल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या सैन्यदलात खालच्या दर्जाची पदे भरण्यासाठी हा नियम बनवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनमध्ये 'मोबिलायझेशन लॉ' लागू करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर एका दिवसाच्या आत हा कायदा लागू करण्यात आला आहे. युक्रेनच्या संसदेत हा कायदा गेल्यावर्षीच पारित करून घेण्यात आला होता, मात्र हा कायदा लागू करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांना इतका वेळ का लागला हे समजू शकलेले नाही.

युक्रेनने सैन्य दलात भरतीची अट असलेली वयोमर्यादा 27 वरून 25 वर आणली आहे. सैन्यात नव्या दमाच्या नागरिकांनी सहभागी व्हावे आणि देशसेवेसाठी हातभार लावावा हा यामागचा उद्देश असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. तसेच दोन वर्षांहून अधिक काळ चालत असलेल्या युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांवर नव्याने भरती करण्यासाठी सैनिकांची गरज आहे. अशावेळी पदभरतीच्या वयोमर्यादेची अट शिथिल केल्याने सैन्याच्या भरतीसाठी तरुण मंडळी अधिक उत्साहाने सामील होतील, अशी आशा सैन्यदल आणि प्रशासनाला आहे.

सैनिकांच्या कमतरतेमुळे 'मोबिलायझेशन लॉ' लागू करण्यात आला आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांनी याबाबत कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही. तसेच देशाला किती नवीन सैनिक मिळतील किंवा कोणत्या दर्जाची पदे भरली जातील याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनला पायदळातील सैनिकांची कमतरता भासत आहे. तसेच दारुगोळ्याची ही कमी जाणवत आहे. अशावेळी सैन्य भरती हा एक संवेदनशील विषय ठरलेला आहे. या गोष्टी लक्षात घेता रशियाने युद्धात अधिक आक्रमक होत पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. युक्रेनच्या कमतरता लक्षात घेऊन त्याचा फायदा उचलणे आणि योजनाबद्ध पद्धतीने युक्रेनवर हल्ला चढवणे, असा रशियाचा प्लॅन असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय झाल्याचे समजते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धSoldierसैनिक