शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 18:40 IST

"आमचे ड्रोन रशियामध्ये दूरवर जाऊन Tu-95, Tu-22 आणि महागडे तथा दुर्मिळ A-50 हेरगिरी करणाऱ्या विमानांना निशाणा करण्यात यशस्वी ठरले."

युक्रेनने रशियाच्या ओलेन्या आणि बेलाया या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. युक्रेनियन सैन्याने या हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला. लक्ष्य करण्यात आलेली दोन्ही हवाई तळं रशिया-युक्रेन सीमेपासून बरीच आत आहेत. महत्वाचे म्हणजे, हा हल्ला आपण केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे युक्रेनियन सूत्रांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, युक्रेनने अशा तळांना निशाणा बनवले आहे, ज्यांचा वापर रशिया त्यांच्यावर बॉम्बिंग करण्यासाठी करत होता.

यासंदर्भात बोलताना युक्रेनने म्हटले आहे की, आपण रशियातील अनेक हवाई तळांवर ड्रोनने हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत रशियाचे ४० हून अधिक बॉम्बर्स नष्ट झाले आहेत. याच विमानांचा वापर रशिया युक्रेनवर बॉम्बिंग करण्यासाठी करत होता. युक्रेनचे म्हणणे आहे की, हीच विमाने युक्रेनवर घिरट्या घालत होते आणि बॉम्बिंग करत होते.

महत्वाचे म्हणजे, आमचे ड्रोन रशियामध्ये दूरवर जाऊन Tu-95, Tu-22 आणि महागडे तथा दुर्मिळ A-50 हेरगिरी करणाऱ्या विमानांना निशाणा करण्यात यशस्वी ठरले, असे युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या (SBU) अधिकाऱ्याने सांगितले.

एसबीयूने म्हटले आहे की, "बेलाया" या एअर बेसवर हल्ला झाला. जे रशियातील इर्कुत्स्क भागात आहे. याशिवाय, "ओलेन्या" एअर बेसवरही आग लागल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

ही विमाने रशियासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. उदाहरणार्थ, Tu-95 हे १९५० च्या दशकातील जुने विमान आहे. मात्र, ते अजूनही अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. जे दूरवरच्या शहरांनाही लक्ष्य करू शकते. या विमानात जेट इंजिनऐवजी मोठे फिरणारे प्रोपेलर आहेत हे विमान लांब पल्ल्याचे अंतरही कापू शकते.

Tu-22 हे एक हाय-स्पीड विमान आहे. हे विमान काही खास क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते. A-50 हे एक दुर्मिळ आणि महागडे हेरगिरी करणारे विमान आहे. रशियाकडे अशी सुमारे 10 विमाने आहेत, ज्यांची किंमत प्रत्येकी सुमारे 350 मिलियन डॉलर एवढी आहे. याशिवाय, Tu-160, हे जगातील सर्वात मोठा बॉम्बर विमान आहे. जे १९८० च्या दशकात बनवण्यात आले होते. परंतु आजही रशियन हवाई दलातील सर्वात धोकादायक विमान मानले जाते. हे विमान अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.रशिया अथवा इतर कुठल्या देशाकडून अद्याप या हल्ल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. यामुळे काही माहिती बदलूही शकते. मात्र, हे खरे असेल, तर हा युक्रेनचा रशियाच्या हवाई शक्तीवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जाईल. याचवेळी, आपले ड्रोन उड्डाण करत राहतील आणि प्रत्युत्तर देत राहतील, असे युक्रेनने म्हटले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाfighter jetलढाऊ विमान