युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 07:10 IST2025-10-19T07:09:25+5:302025-10-19T07:10:01+5:30
ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झेलेन्स्की आणि त्यांच्या टीमसोबत दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा केली.

युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा
वॉशिंग्टन : युक्रेन-रशियामधील युद्ध संपवा आणि दोन्ही देशांनी जेथे आहात तेथे थांबावे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आवाहन केले आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासमवेत प्रदीर्घ बैठक घेतल्यानंतर आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या वर्षभराच्या काळात हे युद्ध थांबले नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली. ट्रम्प यांची ही निराशा युक्रेनने गमावलेली जमीन त्यांना परत मिळू शकत नाही व युक्रेनने हा प्रयत्नही सोडून द्यावा, अशा स्वरूपाची आहे.
ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झेलेन्स्की आणि त्यांच्या टीमसोबत दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’वर एका पोस्टमध्ये, ‘खूप रक्तपात झाला आहे, उद्ध्वस्त मालमत्तेचे मोल युद्ध आणि शौर्यावर ठरवले जात आहेत. त्यांनी जिथे आहे तिथेच थांबावे. दोघांनाही विजयाचा दावा करू द्या, इतिहासाला निर्णय घेऊ द्या!’ अशी विधाने केली आहेत. या भेटीनंतर ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे पोहोचताच दोन्ही देशांना त्वरित युद्ध थांबवण्याची विनंती केली व रशियाने बळकावलेला प्रदेश स्वतःकडे ठेवावा, असा सल्ला दिला. (वृत्तसंस्था)