शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 2:54 PM

Coronavirus Vaccine : संयुक्त अरब अमिरातीनं सायनोफार्मचे तीन डोस देण्याची दिली परवानगी. चीनच्या लसीनं दिला संयुक्त अरब अमिरातीला धोका.

ठळक मुद्देसंयुक्त अरब अमिरातीनं सायनोफार्मचे तीन डोस देण्याची दिली परवानगी.चीनच्या लसीनं दिला संयुक्त अरब अमिरातीला धोका.

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांशिवाय लसीकरणदेखील महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगवान केली आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीचं उत्पादन केलं. यामध्ये चीनचाही समावेश होता. चीननं कोरोनाचा सामना करण्यासाठी सायनोफार्म (Sinopharm) नावाची लस तयार केली. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीनं चीनकडून या लसी घेऊन देशात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु या लसीचे दोन डोस दिल्यानंतरही ज्यांनी ही लस घेतली त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयारच झाल्या नाहीत. अशा परिस्थितीच संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिसरा डोस देण्याची तयारी केली जात आहे. द नॅशनल न्यूज पेपरमध्ये मार्च महिन्यात प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार काही अशा लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात आला ज्यांच्यामध्ये दोन डोसनंतरही अँटीबॉडीजच तयार झाल्या नाहीत.  चीनच्या लसीत्या क्षमतेवरही आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या इमरजन्सी क्रायसिस अँड डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं (National Emergency Crisis and Disaster Management Authority) ज्या लोकांनी या लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी तिसरा डोस उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिसरा डोस अशा व्यक्तींना देण्यात आला ज्यांच्यामध्ये दोन डोसनंतरही अँटीबॉडीज तयारच झाल्या नाहीत. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं या लसीच्या क्षमतेवर दावा करत ती ७९ टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमघ्ये आतापर्यंत १ कोटी १५ लाख लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये फायझर आणि अॅस्ट्राझेनकाची लसही दिली जात आहे. परंतु मोठ्या प्रमाणात चिनी लस देण्यात येत आहे. सेशेल्समध्येही ६० टक्के नागरिकांना सायनोफार्मची लस देण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती