जपानमध्ये 'हगीबिस' चक्रीवादळामुळे 33 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:59 AM2019-10-14T10:59:40+5:302019-10-14T11:04:35+5:30

जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा बसला असून यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

Typhoon leaves 33 dead as Japan launches major rescue | जपानमध्ये 'हगीबिस' चक्रीवादळामुळे 33 जणांचा मृत्यू

जपानमध्ये 'हगीबिस' चक्रीवादळामुळे 33 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा बसला असून यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. 73 लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. जवळपास 30,000 घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

टोकियो - जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा बसला असून यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 60 वर्षातील जपानमधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याची माहिती मिळत आहे. तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा जपानच्या अनेक भागांना बसला आहे. पुराचे पाणी नागरी वस्त्यांत शिरले आहे. वादळादरम्यान झालेल्या वेगवान वाऱ्याने टोकियोला अक्षरश: झोडपून काढले. पुरात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी लष्कर, अग्निशमन, आपत्ती निवारण पथकासह 1 लाख सुरक्षा कर्मचारी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. 

'हगीबिस' चक्रीवादळामुळे रग्बी विश्वचषक स्पर्धेतील तिसरा सामना रद्द करावा लागला आहे. सरकारने या वादळात 14 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण बेपत्ता झाल्याचं म्हटलं आहे. मात्र स्थानिक प्रसार माध्यमांनी वादळाच्या तडाख्यात 33 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. जपानमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत 73 लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सार्वजनिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. जपानमधील रेल्वेसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. वारा आणि पाऊस यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. जवळपास 30,000 घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

One person dead as Typhoon Hagibis bears down on Japan | जपानला

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकियोतील सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल आणि इतर ठिकाणं बंद ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन सेवांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. 144 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सुमारे 73 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. वादळाला ‘हगिबीस’ हे नाव फिलीपाईन्सने दिले असून याचा अर्थ 'वेगवान' असा होतो. 

नदीजवळ राहणाऱ्या लोकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन आश्रय घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाऱ्याचा तासाला 144 किलोमीटर वेग आहे. टोकियो आणि उत्तर जपानकडे वारे वाहत असून, अनेक भागांना मोठा तडाखा बसला आहे. जपानच्या हवामान विभागाने टोकियो आणि परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसेल असा इशारा दिला होता. शिझुका भागाला 5.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 1958 मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतरचं हे सर्वांत शक्तिशाली वादळ ठरू शकतं. चक्रीवादळानंतर 1,200 लोकांचा मृत्यू झाला होता.


 

Web Title: Typhoon leaves 33 dead as Japan launches major rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.