Reel बनवणाऱ्या २ मुलींना इराणमध्ये अटक; मिळणारी शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:59 IST2025-01-25T12:59:05+5:302025-01-25T12:59:36+5:30
इराणमध्ये महिला आणि युवती त्यांच्या अधिकारांसाठी वारंवार आवाज उठवतात. २०२२ साली आंदोलनात शाळकरी मुलींनी पाठ्यपुस्तक फाडून निषेध केला होता. ज्यात धार्मिक नेत्यांची चित्रे नष्ट करण्यात आली होती.

Reel बनवणाऱ्या २ मुलींना इराणमध्ये अटक; मिळणारी शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल
तेहरान इथं युद्ध स्मारकाजवळ डान्स करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इराणमध्ये २ मुलींना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. त्यात २ मुली सेक्रेड डिफेंस वॉर मेमोरियलजवळ डान्स करताना दिसत होत्या. हे स्मारक १९८०-८२ च्या इराक-इराण युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची आठवण म्हणून बांधलं गेले आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, व्हिडिओतील २ मुलींनी जीन्स घातली होती तर एकीने स्वेटर आणि दुसरीने निळ्या रंगाचा टॉप घातला होता. इराणी अधिकाऱ्यांनी हे कृत्य अशोभनीय असल्याचं सांगितले. या २ मुलींना अटक करण्यासोबतच त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. या अटकेवर काही इराणी महिलांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टवरून विरोध दर्शवला आहे. इराणच्या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी डान्स करणे, मग तो पुरुष असो वा महिला असतील हे कृत्य म्हणजे गुन्हा आहे. त्यामुळे शिक्षा म्हणून अशा आरोपींना ९९ चाबकाचे फटके मारण्यात येतात. हा प्रकार पहिल्यांदाच झाला नसून इराणमध्ये वारंवार डान्स करण्यावरून अनेकांना कठोर शिक्षा मिळाली आहे.
२०१४ साली ६ युवकांनी फारेल विलियम्सच्या गाण्यावर डान्स करून व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यांना १ वर्ष जेल आणि ९९ चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावली होती. २०१८ साली १८ वर्षीय माइदे होजाबरीला सोशल मीडियावर डान्स करून व्हिडिओ पोस्ट केला म्हणून अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर २००४ साली १६ वर्षीय युवती अरजू खवारीने आत्महत्या केली होती. तिला विना हिजाब डान्स करताना दिसली तर शाळेतून काढण्याची धमकी मुख्याध्यापकांना दिली होती. अरजू जी अफगाणची नागरिक होती आणि तेहरानमध्ये राहत होती. दीर्घ काळापासून ती शाळेतील ड्रेस कोड आणि धोरणांमुळे मानसिक तणावात होती.
दरम्यान, इराणमध्ये महिला आणि युवती त्यांच्या अधिकारांसाठी वारंवार आवाज उठवतात. २०२२ साली आंदोलनात शाळकरी मुलींनी पाठ्यपुस्तक फाडून निषेध केला होता. ज्यात धार्मिक नेत्यांची चित्रे नष्ट करण्यात आली होती. अनेकांनी डोक्यावरचा स्कार्फ हवेत उडवून इस्लामिक शासनाच्या धोरणांचा विरोध करत घोषणाबाजी केली होती. इराणमध्ये १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर डान्सवर बंदी लावण्यात आली आहे. या क्रांतीने देशातील राजेशाही संपुष्टात आली. खुमैनी यांच्या निधनानंतर १९८९ साली आयतुल्लाह अली खामेनेई देशातील सर्वोच्च नेते बनले.