डॉलरचं स्वप्न, हिमवादळाचा तडाखा अन् मृत्यू; मानवी तस्करांच्या जाळ्यात 'असं' अडकलं भारतीय कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:29 IST2025-05-29T19:29:01+5:302025-05-29T19:29:42+5:30

एका व्यक्तीकडून जवळपास १ लाख डॉलर मिळवायचे. या टोळीत पटेल तस्करीची पूर्ण योजना बनवत होता.

Two human traffickers were sentenced 10 Years After Indian Family Froze to Death | डॉलरचं स्वप्न, हिमवादळाचा तडाखा अन् मृत्यू; मानवी तस्करांच्या जाळ्यात 'असं' अडकलं भारतीय कुटुंब

डॉलरचं स्वप्न, हिमवादळाचा तडाखा अन् मृत्यू; मानवी तस्करांच्या जाळ्यात 'असं' अडकलं भारतीय कुटुंब

प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असते, त्यांच्या मुलांना चांगले जीवन जगता यावे. चांगली कमाई करावी, परदेशात स्थायिक व्हावे परंतु ही स्वप्ने माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना बळी पडतात. याचा शेवट होतो तो मृत्यूने..असाच काही प्रकार भारतीय कुटुंबासोबत घडला. जे अमेरिकेत स्थायिक होण्याचं स्वप्न घेऊन निघाले होते. परंतु हिमवादळाच्या तडाख्याने त्यांचे स्वप्न मृत्यूत बदललं. 

जानेवारी २०२२ मध्ये हिमवादळामुळे भारतीय कुटुंबातील २ लहान मुलांसह आई वडिलांचा कॅनडा-अमेरिका बॉर्डरवर मृत्यू झाला. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करांचा पर्दाफाश झाला. या गुन्ह्यात सहभागी २ आरोपींना आता अमेरिकन कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. अमेरिकेतील मिनेसोटा जिल्ह्यात दोषी आढळलेल्या २९ वर्षीय हर्षकुमार रमणलाल पटेल याला १० वर्ष १ महिने जेलची तर ५० वर्षीय स्टीव अँथनीला ६ वर्ष ६ महिन्याची जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तपासात समोर आला प्रकार

तपासात हे दोन्ही आरोपी भारतातून लोकांना कॅनडात बनावट स्टुडेंट व्हिसावर आणत होते आणि त्यांना बेकायदेशीर मार्गे अमेरिकेत पाठवत होते यासाठी ते खूप मोठी रक्कम लोकांकडून उकळत होते हे समोर आले. एका व्यक्तीकडून जवळपास १ लाख डॉलर मिळवायचे. या टोळीत पटेल तस्करीची पूर्ण योजना बनवत होता. दुसरा बॉर्डर पार करताच लोकांना पिकअप करून शिकागोपर्यंत घेऊन जायचा. १८ जानेवारी २०२२ मध्ये त्याने ११ जणांना सीमापार केले. हवामान खात्याने आधीच मायनस ३६ डिग्री तापमानासह हिमवादळाचा इशारा दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी १९ जानेवारीला शँडचे वाहन बर्फात अडकल्याचे अमेरिकन सुरक्षा दलाने पाहिले. त्याच्यासोबत २ जण होते, त्यांना लपवून ठेवले होते. त्याचदिवशी कॅनडाच्या रॉयल माऊंटेड पोलिसांना सीमेवर एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले. त्यात ३ वर्षीय मुलगा, ११ वर्षीय मुलगीसह त्यांच्या आई वडिलांचा समावेश होता. 

दरम्यान, हे प्रकरण पुढे कोर्टात गेले तेव्हा पटेल आणि शँड यांनी लालसेपोटी लोकांचा जीव धोक्यात घातल्याचे सिद्ध झाले. या गुन्ह्यात दोन्ही आरोपी दोषी आढळले. अमेरिकेतील कोर्टाने म्हटलं की, आम्ही जेव्हा या खटल्याचा विचार करतो, तेव्हा आम्हाला ते २ लहान जीव समोर दिसतात. त्यांनाही तस्करांनी सोडले नाही. हा खटला आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करणारे ठरले. ज्यातून शेकडो तस्करांना अटक करून शिक्षा सुनावण्यात आली.

Web Title: Two human traffickers were sentenced 10 Years After Indian Family Froze to Death