इराणवरील हल्ल्यानंतर तुर्कीनं खेळलं इस्लामिक कार्ड; "शिया असो वा सुन्नी सर्व मुस्लिमांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:51 IST2026-03-12T13:49:31+5:302026-03-12T13:51:56+5:30

या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्यासह वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणमधील पायाभूत सुविधांनाही हल्ल्याचा मोठा फटका बसला

Turkey played Islamic card after attack on Iran, appeal to all Muslims, whether Shia or Sunni, to unite | इराणवरील हल्ल्यानंतर तुर्कीनं खेळलं इस्लामिक कार्ड; "शिया असो वा सुन्नी सर्व मुस्लिमांनी..."

इराणवरील हल्ल्यानंतर तुर्कीनं खेळलं इस्लामिक कार्ड; "शिया असो वा सुन्नी सर्व मुस्लिमांनी..."

अंकारा - अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव पसरला आहे. त्यातच तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन यांनी त्यांचा मुस्लीम अजेंडा रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मध्य पूर्वेतील युद्धातच एर्दोगन यांनी जगातील मुसलमानांना एकजूट होण्याचं आवाहन केले आहे. एर्दोगन यांनी पक्षाच्या बैठकीत हे विधान केले. त्यात युद्ध रोखण्याचं आवाहन करत आम्ही शांततेसाठी प्रयत्न करत आहोत असं म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार, तुर्कीच्या राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात एर्दोगन यांनी इराणवरील अमेरिका-इस्रायल यांच्या हल्ल्याचा उल्लेख करत हा विध्वंस असल्याचं म्हटलं. एर्दोगन यांची प्रतिक्रिया अशावेळी आली आहे जेव्हा अमेरिका इस्रायलने इराणविरोधात मोठ्या प्रमाणात हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्यासह वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणमधील पायाभूत सुविधांनाही हल्ल्याचा मोठा फटका बसला. इराणमधील लोक प्रत्येक दिवशी मृत्यूचा सामना करत आहेत. 

या युद्धातच तुर्कीचे राष्ट्रपती इस्लामिक एकता दाखवण्याची संधी शोधत आहेत. आपल्या क्षेत्रातील लोकांनी, ज्यात इराणी लोकांचाही समावेश आहे. त्यात आम्ही कधीही शिया, सुन्नी, तुर्क आणि कुर्द असा भेदभाव करणार नाही. आम्ही त्या नजरेने पाहणारही नाही. आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीसोबत उभे आहोत ज्याच्यासोबत चुकीचे घडले आहे. जो पीडित आहे. आम्ही वंश, पंथ, धर्म, भाषा किंवा मूळ यावर आधारित भेदभाव नाकारतो असं एर्दोगन यांनी स्पष्ट केले आहे.

शिया, सुन्नी भेद संपवण्याचं आवाहन

दरम्यान, शियावाद, सुन्नीवाद हा कुठलाही धर्म नाही तर आमचा केवळ एकच धर्म आहे तो म्हणजे इस्लाम, हजरत अली आमचे आहेत, हजरत उमर आमचे आहेत. हजरत आयशा आमची आई आहे. माँ हजरत जैनबही आमची आहे असं सांगत एर्दोगन यांनी सर्व मुसलमानांना एक होण्याचं आवाहन केले आहे. 

यु्द्धाची किंमत जगाला चुकवावी लागेल

एर्दोगन यांनी इराणवरील हल्ल्यामुळे जागतिक परिणाम बोलून दाखवले आहेत. तेलाच्या वाढत्या किंमतीचा उल्लेख करत त्यांनी ही लढाई केवळ २ देशांमधील नाही तर संपूर्ण जग याची किंमत चुकवण्याची तयारी करत आहेत असंही एर्दोगन यांनी म्हटलं.  

Web Title : ईरान पर हमले के बाद तुर्की ने दिया इस्लामिक एकता का नारा; मुस्लिम एकजुट हों।

Web Summary : ईरान पर हमलों के बाद, तुर्की के राष्ट्रपति एर्दोगन ने मुस्लिम एकता का आह्वान किया और शिया-सुन्नी विभाजन की निंदा की। उन्होंने हमलों की आलोचना करते हुए वैश्विक परिणामों, विशेष रूप से बढ़ती तेल की कीमतों की चेतावनी दी। उन्होंने सभी पीड़ितों के साथ एकजुटता पर जोर दिया, चाहे उनकी पृष्ठभूमि कुछ भी हो।

Web Title : Turkey calls for Muslim unity after Iran attack; invokes Islamic card.

Web Summary : Following attacks on Iran, Turkish President Erdogan urged Muslim unity, denouncing Shia-Sunni divisions. He criticized the attacks, warning of global consequences, especially rising oil prices. He emphasized solidarity with all victims, regardless of background.