दुबई : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल जहाजांना लक्ष्य करून इंधन पुरवठा थांबवला असल्याने अमेरिकेने 'जी-७' देशांना साकडे घातले आहे. होर्मुझमधून तेल जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा म्हणून 'जी-७' गटाच्या देशांनी युद्धनौका पाठवाव्यात असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. पण या आवाहनाला जी -७ देशांना भरीव असा प्रतिसाद दिला नाही. अमेरिकेच्या या आवाहनावर चीनने आखातातील युद्ध प्रथम थांबवावे व चर्चा करावी अशी भूमिका घेतली आहे.
या घडामोडीत हॉर्मुझ बंदरातून आपल्या मित्र राष्ट्रांच्या माल वाहतूक जहाजांना अडवले जात नाही पण अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांची जहाजे आम्ही अडवत असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणकडून काही व्यापारी जहाजांवर हल्ले झाल्याने होर्मुझमधील जहाजवाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सोमवारी प्रति बॅरल १०४ अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचल्या. या संघर्षामुळे खतांच्या किमती वाढल्या असून गरीब देशांमध्ये अन्नटंचाईची भीती निर्माण झाली आहे.
शिवालिक पोहोचले, 'जग लाडकी'ही लवकरच येणारसंयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह बंदरावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथून सुरक्षितपणे रवाना झालेला भारतीय ध्वजधारी कच्चे तेल वाहून नेणारा टँकर ‘जग लाडकी’ मंगळवारी भारतात पोहोचणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बंदर, नौवहन व जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सोमवारी सांगितले की, ‘जग लाडकी’ या जहाजात यूएईमधून सुमारे ८०,८०० टन कच्चे तेल भारताकडे आणले जात आहे.
जहाजावरील २२ भारतीय नाविक सुरक्षित आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या २८ भारतीय जहाजांपैकी सुरक्षितपणे बाहेर पडणारे हे चौथे जहाज आहे.
'नंदा देवी'ही गॅस घेऊन मंगळवारी पोहोचणारहोर्मुझमधून निघालेले ‘शिवालिक’ हे जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदरात पोहोचले आहे. दुसरे जहाज ‘नंदा देवी’ मंगळवारी सकाळी कांडला बंदरात पोहोचण्याची अपेक्षा आहे. या दोन जहाजांमधून एकूण ९२,७१२ टन एलपीजी आणण्यात आले आहे. हा साठा देशातील एका दिवसाच्या स्वयंपाक गॅसच्या गरजेइतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २२ भारतीय ध्वजधारी जहाजे आणि ६११ नाविक सध्या आखातात अडकलेले आहेत.
इराणची भारतासमोर अट, तीन जहाजे सोडाहोर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याच्या चर्चेदरम्यान इराणने भारताकडे काही अटी मांडल्या असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार, भारताने फेब्रुवारी महिन्यात जप्त केलेली ‘ॲस्फाल्ट स्टार’, ‘अल जाफझिया’ आणि ‘स्टेलर रुबी’ ही तीन टँकर जहाजे सोडावीत, तसेच काही औषधे आणि वैद्यकीय उपकरणे पुरवावीत, अशी मागणी इराणने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र भारत सरकारने हे वृत्त फेटाळले आहे.
विमानतळावर ड्रोन हल्लादरम्यान सोमवारी इराणने दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण विमानतळावरील एका इंधन टाकीला आग लागल्याने काही तासांसाठी विमानतळ बंद ठेवावा लागला.
आखातातील घडामोडीया घडामोडी एकीकडे सुरू असताना इराणने अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ला केला त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सौदी अरेबियाने आपण इराणची ३५ मानवरहित विमाने पाडल्याचा दावा केला. इराण कतारवरही हल्ले करत असल्याने कतारने आमच्या नागरी वस्त्यांवरचे हल्ले त्वरित थांबवावेत आणि राजनयिक चर्चा करावी अशी इराणला विनंती केली आहे.सोमवारी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर हल्ले सुरूच ठेवले, तसेच इस्रायलने बैरूत आणि दक्षिण लेबनॉनवरही तुफान बॉम्बहल्ले केले. दक्षिण लेबनॉनमध्ये या हल्ल्यांत ७ ठार झाले. आतापर्यंत इस्रायली हल्ल्यांत लेबनॉनममध्ये ८५० हून अधिक नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे.
घसरणीला ब्रेक -तीन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर सोमवारी शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स तब्बल ९३८.९३ अंकांनी उसळून ७५,५०२.८५ वर बंद झाला, तर निफ्टी २५७.७० अंकांनी वाढत २३,४०८.८० वर स्थिरावला.
Web Summary : Amidst Hormuz Strait tensions, Trump seeks help, but G7 hesitates. Fuel ships reach India despite regional conflicts and rising oil prices. Iran sets conditions for safe passage, denying the claims by India.
Web Summary : होर्मुज जलसंधि में तनाव के बीच, ट्रंप ने मदद मांगी, लेकिन जी7 हिचकिचाया। क्षेत्रीय संघर्षों और बढ़ती तेल की कीमतों के बावजूद ईंधन जहाज भारत पहुंचे। ईरान ने सुरक्षित मार्ग के लिए शर्तें रखीं, भारत के दावों का खंडन किया।