शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘नासा’च्या दोन मोहिमांवर आता ट्रम्प यांची वक्रदृष्टी; शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:52 IST

ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला तर या क्षेत्रातील शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा स्रोत बंद होऊ शकतो. अमेरिकेच्या २०२६साठीच्या

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाची वक्रदृष्टी आता अमेरिकी एअरॉनॉटिक्स व अंतराळ व्यवस्थापन (नासा) संस्थेवर पडली असून, या संस्थेच्या दोन मोहिमा बंद करण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. कार्बन उत्सर्जन आणि रोपांच्या आरोग्याबाबत माहिती देणाऱ्या या मोहिमा आहेत.

ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला तर या क्षेत्रातील शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा स्रोत बंद होऊ शकतो. अमेरिकेच्या २०२६साठीच्याआर्थिक तरतुदीसंबंधी प्रस्तावात ‘ऑर्बिटिंग कार्बन ऑब्झर्व्हेटरी’ मोहिमांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

काय आहेत या मोहिमा?‘नासा’च्या या मोहिमा पिकांची वाढ आणि कार्बन उत्सर्जन नेमके कुठे अधिक, कुठे कमी होत आहे हे सांगू शकतील. शिवाय उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साईड वायू सर्वाधिक प्रमाणात कुठे शोषला जात आहे, हेपण यातून स्पष्ट होऊ शकणार आहे.

‘ही राष्ट्रीय संपत्ती’  ‘नासा’चे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डेव्हिड क्रिस्प यांच्यानुसार, या मोहिमा एक राष्ट्रीय संपत्ती आहेत. जगातील अशा प्रणालींच्या तुलनेत अचूक माहिती देणारे हे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प वाचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. 

मोहिमेमुळे हे मिळाले निष्कर्ष  अमेझॉनसारख्या जंगलांत जेवढा कार्बन शोषून घेतला जातो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तो उत्सर्जित होत असल्याचे या मोहिमांतून सिद्ध झाले आहे;  तर, कॅनडा, रशिया आणि हिमनग ज्या भागांत वितळतात, अशा ठिकाणी असलेल्या जंगलांत कार्बन अधिक शोषून घेतला जातो.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNASAनासा