India Pakistan Conflict: भारत, पाकच्या दोन अत्यंत हुशार नेत्यांनी युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:11 IST2025-06-20T12:11:18+5:302025-06-20T12:11:18+5:30

Donald Trump On India Pakistan Tension: भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

Trump says two leaders of India and Pakistan decided to stop conflict | India Pakistan Conflict: भारत, पाकच्या दोन अत्यंत हुशार नेत्यांनी युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा गौप्यस्फोट!

India Pakistan Conflict: भारत, पाकच्या दोन अत्यंत हुशार नेत्यांनी युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा गौप्यस्फोट!

न्यूयॉर्क/इस्लामाबाद : भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, ते नेते कोण हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. संघर्ष थांबविण्यासाठी केलेल्या कामगिरीमुळेच मी मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये खास मेजवानी दिली, असे मात्र ते म्हणाले.

७ ते १० मे या कालावधीत भारत-पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष संपविण्यासाठी मी मध्यस्थी केली, असा दावा ट्रम्प यांनी याआधी अनेकदा केला आहे. ते म्हणाले की, भारत व पाकिस्तानमधील दोन नेत्यांच्या प्रयत्नांमुळे दोन देशांतील संघर्ष थांबला. मुनीर स्वत: युद्धाच्या मैदानात उतरले नाहीत. मात्र, त्यांची हा संघर्ष थांबविण्यास मदत झाली. मी मुनीर व मोदी यांचे आभार मानतो. (वृत्तसंस्था)

ट्रम्प यांना नोबेल द्या : मुनीर
ट्रम्प यांच्या खास निमंत्रणावरून अमेरिकेत गेलेले पाकिस्तानी लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील आण्विक युद्ध रोखले असल्याचे मुनीर यांनी नमूद केले. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या ॲना केली यांनी याची सांगितले की, ‘‘मुनीर यांनी नोबेलसाठी ट्रम्प यांच्या नामांकनाची शिफारस केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना व्हाइट हाऊसवर खास स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते.’’

ट्रम्प यांनी मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये खासगी जेवणासाठी आमंत्रित केले. मुनीर यांना दिलेल्या या मेजवानीबद्दलच्या मीम्सनी मात्र सर्वच समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला असून, ते ट्रोल होत आहेत. जनरल मुनीर यांना भुकेले आणि असहाय्य दाखवण्यात आले आहे. पाकिस्तानी जनता दोन वेळच्या अन्नासाठी ताटकळत असताना, देशाच्या लष्करप्रमुखांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले जात आहे, अशी टीका त्यांच्यावर केली जात आहे.

Web Title: Trump says two leaders of India and Pakistan decided to stop conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.