शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब

By जयदीप दाभोळकर | Published: January 07, 2021 4:31 PM

या घोषणेपूर्वी सकाळी ट्रम्प समर्थकांकडून संसेदेच्या परिसरात घडला होता हिंसाचार

ठळक मुद्देयापूर्वी संसंदेच्या परिसरात घडला होता हिंसाचार२० जानेवारीला जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा

अमेरिकन काँग्रेसनं डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. एकीकडे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असून अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. जो बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मतं मिळाली. तसंच २० जानेवारी रोजी आपण सत्तेचं हस्तांतरण करणार असल्याचंही ट्रम्प यांनी गुरूवारी सांगितलं. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्रात औपचारिक पद्धतीनं राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयानंतर काही वेळानं आपण शांततेत सत्तेचं हस्तांतरण करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. "या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या उत्तम कार्यकाळाचा शेवट झाला आहे. अमेरिकेला पुन्हा मोठं करण्यासाठी आमच्यासाठी ही संघर्षाची सुरूवात आहे," असंही ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं वक्तव्य केलं. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी पार पडणार आहे. परंतु कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत साधेपणानं पार पडणार आहे. अमेरिकनं संसदेच्या संयुक्त सत्रात गुरूवारी औपचारिक रित्या बायडेन यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. यापूर्वी कॅपिटल बिल्डींगमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार घडवला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाले होते तर चार जणांचा मृत्यूही झाला होता. हिंसाचारानंतर खासदारांना सुरक्षित स्थानी नेण्यात आलं. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. बायडेन आणि हॅरिस यांना ३०६ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली होती. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाUS Riotsअमेरिका-हिंसाचार