शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरचा धक्का, 'या' कारणामुळे अकाऊंट कायमचे सस्पेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 07:49 IST

Trump Permanently Banned From Twitter : ट्विटरने भविष्यातही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये, दंगली केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचे ट्विटर खाते कायमस्वरुपी बंद केले आहे.

ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होईपर्यंत त्यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद राहील.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटरने मोठा धक्का दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. ट्विटरने भविष्यातही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये, दंगली केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचे ट्विटर खाते कायमस्वरुपी बंद केले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी गेल्या गुरुवारी अमेरिकेची संसद कॅपिटॉल बिल्डींगमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केली होती. या हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला. 

दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होईपर्यंत त्यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद राहील. त्यामुळे ट्रम्प पुढील दोन आठवडे फेसबुक, इन्स्टाग्रामवर काहीही पोस्ट करू शकणार नाहीत. तसेच, दोन आठवड्यांत ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेल. त्यानंतर ज्यो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू होण्याची शक्यता आहे. 

अमेरिकन संसदेवर ट्रम्प समर्थकांचा धुडगूसराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) प्रचंड धुडगूस घातला. कॅपिटल हिलवर  झालेल्या या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. दरम्यान, अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील मतमोजणीवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक झाले होते. ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न करत कॅपिटॉल बिल्डींगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रम्प समर्थक आक्रमक झाले आणि हिंसेला सुरुवात झाली होती. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत महाभियोग? डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला चढविल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे. ट्रम्प यांना राष्ट्रध्यक्षपदावरून तातडीने हटविण्याबाबत सर्व कायदेशीर मार्गांचा विचार करण्यात येत आहे. तसे न झाल्यास त्यांच्यावर महाभियोग चालविण्याचा इशाराही प्रतिनिधी सभेने दिला आहे. तर दुसरीकडे अध्यक्षीय अधिकारांचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:ला माफ करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाJoe Bidenज्यो बायडन