मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज लीक करत ट्रम्प यांनी उडवली खिल्ली! 'ग्रीनलँड'वरून मैत्रीत मिठाचा खडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:57 IST2026-01-20T13:57:16+5:302026-01-20T13:57:43+5:30

ट्रम्प यांनी चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज थेट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Trump mocks Macron by leaking private messages! A thorn in the side of friendship over 'Greenland'? | मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज लीक करत ट्रम्प यांनी उडवली खिल्ली! 'ग्रीनलँड'वरून मैत्रीत मिठाचा खडा?

मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज लीक करत ट्रम्प यांनी उडवली खिल्ली! 'ग्रीनलँड'वरून मैत्रीत मिठाचा खडा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि अनपेक्षित शैलीने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा खाजगी मेसेज थेट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, या मेसेजमध्ये मॅक्रॉन यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांच्याकडे काही विनंत्या केल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारे दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे चॅट लीक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मैत्रीत 'टॅरिफ'ची ठिणगी

ट्रम्प आणि मॅक्रॉन यांच्यात सध्या ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून मोठी तणावाची स्थिती आहे. ट्रम्प यांनी फ्रान्समधून येणाऱ्या मद्यावर २०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्याने आधीच वातावरण तापले आहे. अशातच हा मेसेज लीक झाल्याने फ्रान्सच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

काय आहे त्या मेसेजमध्ये?

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये मॅक्रॉन यांनी लिहिले आहे की: "माझ्या मित्रा, सीरियाच्या मुद्द्यावर आपण सहमत आहोत. इराणच्या बाबतीतही आपण खूप काही करू शकतो, पण तुम्ही ग्रीनलँडबद्दल जे काही करत आहात, ते मला समजत नाहीये. चला, काहीतरी महान घडवूया-"

मॅक्रॉन यांनी या मेसेजमध्ये ट्रम्प यांना दोन महत्त्वाचे प्रस्ताव दिले होते: १. स्वित्झर्लंडमधील दावोस येथील बैठकीनंतर गुरुवारी दुपारी पॅरिसमध्ये जी७ची बैठक आयोजित करणे, ज्यामध्ये युक्रेन, रशिया आणि सीरियाच्या प्रतिनिधींनाही बोलावता येईल. २. ट्रम्प अमेरिकेला परत जाण्यापूर्वी पॅरिसमध्ये त्यांच्यासोबत डिनर करणे.

केवळ मॅक्रॉनच नाही, नाटो प्रमुखांनाही सोडलं नाही!

मॅक्रॉन यांच्याआधी ट्रम्प यांनी नाटोचे प्रमुख मार्क रूटे यांचेही चॅट लीक केले आहेत. यामध्ये रूटे ट्रम्प यांची स्तुती करताना दिसत आहेत. ग्रीनलँडच्या मुद्द्यावर जेव्हा नाटो देश अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, नेमक्या त्याच वेळी ट्रम्प यांनी हे चॅट सार्वजनिक करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

"त्यांना गांभीर्याने घेत नाही"; ट्रम्प यांनी उडवली खिल्ली

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांची जाहीर खिल्ली उडवली. "मॅक्रॉन आता फ्रान्समधून जात आहेत, आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांनी जास्त डोकं चालवलं तर आम्ही फ्रेंच वाईनवर २०० टक्के टॅरिफ लावू. ते जेव्हा मला भेटायला येतात, तेव्हा टॅरिफच्या भीतीने प्रचंड घाबरलेले असतात," असे विधान ट्रम्प यांनी केले आहे.

Web Title : ट्रम्प ने मैक्रों के मैसेज लीक किए, ग्रीनलैंड पर उड़ाया मजाक; दोस्ती में दरार?

Web Summary : ट्रम्प ने ग्रीनलैंड को लेकर मैक्रों के निजी संदेश साझा किए, जिससे तनाव बढ़ गया। उन्होंने नाटो नेताओं के साथ चैट लीक करने के बाद फ्रांसीसी शराब पर शुल्क लगाने की धमकी दी। रिश्ते बिगड़े।

Web Title : Trump Leaks Macron's Messages, Mocking Over Greenland; Friendship Strained?

Web Summary : Trump shared Macron's private messages about Greenland, escalating tensions. He mocked Macron, threatening tariffs on French wine after leaking chats with NATO leaders. Relations sour.