भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:55 PM2020-06-12T15:55:57+5:302020-06-12T15:58:31+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हजारो भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता

Trump considering suspending H1B visa over rising US unemployment | भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतात आयआयटी करून बहुतांश विद्यार्थी अमेरिकेला जातात. उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत जाण्याचं स्वप्न अनेक भारतीय तरुण, तरुणी पाहतात. मात्र आता हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एच-१बी (H1-B) व्हिसासह सर्व प्रकारचे एम्पॉयमेंट व्हिसा रद्द करण्याच्या विचारात आहे. वॉल स्ट्रिट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प एच-१बी व्हिसासह सर्व प्रकारचे एम्पॉयमेंट व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प सरकारनं अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर केल्यास इतर देशांमधून अमेरिकेत जाऊन, तिथे नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न भंगेल. मात्र सध्या ज्या व्यक्तींकडे अशा प्रकारचा व्हिसा आहे, त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना अमेरिकेत नोकरी करता येईल.

कोरोनामुळे लाखो भारतीयांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड
इंफोसिस, विप्रोसारख्या भारतीय कंपन्या एच-१ बी व्हिसाच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत साईटवर (ऑन-साईट) पाठवतात. ट्रम्प प्रशासनानं एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास याचा फटका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो व्यक्तींना बसेल. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे आधीच या क्षेत्रातील लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. 

अमेरिकेच्या नागरिकांना रोजगार देण्याची योजना
एच-१ बी व्हिसा रद्द करण्यामागे दोन प्रमुख कारणं असल्याचं वॉल स्ट्रिट जर्नलनं वृत्तात म्हटलं आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यात परदेशी नागरिकांची भर पडू नये, असा ट्रम्प प्रशासनाचा विचार आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यांना रोजगार देण्याचा ट्रम्प सरकारचा मानस आहे. त्यामुळे एच-१ बी व्हिसा रद्द करण्याच्या दृष्टीनं ट्रम्प प्रशासन पावलं टाकत आहे. 

लॉकडाऊनच्या काळातील पूर्ण पगार मिळणार का?; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

धक्कादायक!; कोरोना प्रभावित देशांच्या यादीच भारत चौथा, जाणून घ्या- कोणत्या बाबतीत कितव्या क्रमांकावर

Read in English

Web Title: Trump considering suspending H1B visa over rising US unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.