'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:20 IST2025-08-14T20:18:16+5:302025-08-14T20:20:41+5:30

नोबेल शांतता पुरस्काराची निवड नॉर्वेजियन नोबेल समिती करते. त्यांची नियुक्ती नॉर्वेच्या संसदेद्वारे केली जाते.

'Trump called to discuss tariffs, but started talking about Nobel'; Norwegian newspaper exposes Donald Trump | 'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त कर लादले आहे. या करावरुन आता जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना टॅरिफवर चर्चा करण्यासाठी फोन केला होता. पण यावेळी ट्रम्प यांनी फोनवरुन केलेली चर्चा चर्चेचा विषय बनले. ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्काराची इच्छा कोणापासूनही लपलेली नाही. या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी अचानक नोबेल शांतता पुरस्काराबद्दल विचारणा केली. याबाबत आता नॉर्वेजियन व्यावसायिक वृत्तपत्र डेगेन्स नेरिंगस्लिव्हने गुरुवारी बातमी दिली.

दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल, पाकिस्तान आणि कंबोडिया सारख्या अनेक देशांनी शांतता करार किंवा युद्धविराम आणल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही याबाबत जाहीरपणे म्हटले आहे. हा पुरस्कार अमेरिकेच्या चार माजी राष्ट्राध्यक्षांना देण्यात आला आहे.

सूत्रांचा हवाला देऊन, नार्वेतील वृत्तपत्राने लिहिले की, "अचानक, अर्थमंत्री जेन्स स्टोल्टनबर्ग ओस्लोमध्ये रस्त्यावरून चालत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. त्यांना नोबेल पुरस्काराबद्दल बोलायचे होते - आणि टॅरिफवरही चर्चा करायची होती." सध्या, व्हाईट हाऊस, नॉर्वेचे अर्थ मंत्रालय आणि नॉर्वेजियन नोबेल समितीने यावर त्वरित भाष्य केलेले नाही.

दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाते आणि विजेत्यांची निवड नॉर्वेजियन संसदेने नियुक्त केलेल्या पाच सदस्यांच्या समितीद्वारे केली जाते, या पुरस्काराचे संस्थापक, स्वीडिश उद्योगपती अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार काम करते.

टॅरिफसाठी फोन केला होता

स्टोल्टनबर्ग यांच्याशी झालेल्या संभाषणात ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराचा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. नाटोचे माजी सरचिटणीस स्टोल्टनबर्ग म्हणाले की, ट्रम्प यांच्या नॉर्वेजियन पंतप्रधान जोनास स्टोर यांच्याशी होणाऱ्या नियोजित चर्चेपूर्वी, हा फोन प्रामुख्याने व्यापार शुल्क आणि आर्थिक सहकार्यावर चर्चा करण्यासाठी होता.

Web Title: 'Trump called to discuss tariffs, but started talking about Nobel'; Norwegian newspaper exposes Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.