शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

आता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 9:13 AM

आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क साधणा-यांचीही चाचणी करणे अनिवार्य असेल...

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं हातपाय पसरलेले असून, संपूर्ण जग जागतिक साथीच्या कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. दुसरीकडे अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कोरोना चाचणीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना बदलल्या आहेत. प्रशासनाने हे दुस-यांदा असं केलं आहे. आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क साधणा-यांचीही चाचणी करणे अनिवार्य असेल, अर्थातच त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांना चाचणी करावी लागेल. ज्यांना लक्षणे नसतात, त्यांनी चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) ऑगस्टच्या उत्तरार्धात राज्य आरोग्य अधिकारी व तज्ज्ञांना नाराज केले होते. 24 ऑगस्टपूर्वी व्हायरसची लक्षणे असलेल्या सर्वांसाठी सीडीसीने चाचणी घेणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सीडीसीच्या चाचणीसंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांकडे पाठ फिरविण्यात आली आहे. अमेरिकेतील बर्‍याच राज्यांनी सीडीसीने संसर्ग रोखण्यासाठी 24 ऑगस्टच्या मार्गदर्शक सूचना नाकारल्या आहेत. रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन प्रकरणे कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इटली आणि स्पेनला कोरोनानं विळख्यात घेतल्याचं चित्र होतं, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अमेरिकेत कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 6,874,596 वर पोचली आहे, तर 202,213 पेक्षा जास्त लोक ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत. भारत, ब्राझील, रशिया आणि पेरू यासारख्या देशांमध्येही मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या