शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

हल्ला करणाऱ्या सिंहावर त्यानं केला जोरदार प्रतिहल्ला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 1:41 PM

धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ

कोलोरॅडो: माणसाच्या प्रतिहल्ल्यात पर्वतीय सिंहाचा मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेतील कोलोरॅडोत घडली आहे. कोलोरॅडोच्या उत्तरेकडील भागात एक व्यक्ती धावत असताना पर्वतीय सिंहानं हल्ला केला. त्या व्यक्तीनं सिंहावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यानं सिंहाच्या मानेला हात घातला आणि ती अतिशय जोरात आवळली. त्यामुळे श्वास कोंडला गेल्यानं सिंहाचा मृत्यू झाला. फोर्ट कॉलिन्स भागातील हॉर्सटूथ भागात एक व्यक्ती धावत होती. त्यावेळी आपल्या मागे कोणीतरी असल्याचा संशय त्याला आला. त्यासाठी तो मागे वळला असता, त्याच्यावर पर्वतीय सिंहानं हल्ला केला, अशी माहिती कोलोरॅडो पार्क्स अँड वाईल्डलाईफच्या अधिकाऱ्यांनी दिली. माणसाच्या हालचालींमुळे तरुण सिंहानं हल्ला केला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. पर्वतीय सिंहानं व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि मनगटावर हल्ला केला. त्यातून त्यानं कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. सिंहाच्या तावडीतून सुटका झाल्यावर माणसानं सिंहावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यात सिंहाची मान आवळली. त्यामुळे सिंहाचा श्वासोच्छवास कोंडला गेला आणि तो गतप्राण झाला. सिंहाच्या हल्ल्यात संबंधित व्यक्तीला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप तरी या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृत्यूमूखी पडलेल्या पर्वतीय सिंहाचं वय एक वर्षाहून कमी होतं.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके