हल्ला करणाऱ्या सिंहावर त्यानं केला जोरदार प्रतिहल्ला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 13:43 IST2019-02-06T13:41:40+5:302019-02-06T13:43:21+5:30

धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ

Trail runner in Colorado kills mountain lion in self defense | हल्ला करणाऱ्या सिंहावर त्यानं केला जोरदार प्रतिहल्ला अन्...

हल्ला करणाऱ्या सिंहावर त्यानं केला जोरदार प्रतिहल्ला अन्...

कोलोरॅडो: माणसाच्या प्रतिहल्ल्यात पर्वतीय सिंहाचा मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेतील कोलोरॅडोत घडली आहे. कोलोरॅडोच्या उत्तरेकडील भागात एक व्यक्ती धावत असताना पर्वतीय सिंहानं हल्ला केला. त्या व्यक्तीनं सिंहावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यानं सिंहाच्या मानेला हात घातला आणि ती अतिशय जोरात आवळली. त्यामुळे श्वास कोंडला गेल्यानं सिंहाचा मृत्यू झाला. 

फोर्ट कॉलिन्स भागातील हॉर्सटूथ भागात एक व्यक्ती धावत होती. त्यावेळी आपल्या मागे कोणीतरी असल्याचा संशय त्याला आला. त्यासाठी तो मागे वळला असता, त्याच्यावर पर्वतीय सिंहानं हल्ला केला, अशी माहिती कोलोरॅडो पार्क्स अँड वाईल्डलाईफच्या अधिकाऱ्यांनी दिली. माणसाच्या हालचालींमुळे तरुण सिंहानं हल्ला केला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. पर्वतीय सिंहानं व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि मनगटावर हल्ला केला. त्यातून त्यानं कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. 

सिंहाच्या तावडीतून सुटका झाल्यावर माणसानं सिंहावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यात सिंहाची मान आवळली. त्यामुळे सिंहाचा श्वासोच्छवास कोंडला गेला आणि तो गतप्राण झाला. सिंहाच्या हल्ल्यात संबंधित व्यक्तीला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप तरी या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृत्यूमूखी पडलेल्या पर्वतीय सिंहाचं वय एक वर्षाहून कमी होतं. 
 

Web Title: Trail runner in Colorado kills mountain lion in self defense