saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:59 IST2025-11-18T07:57:38+5:302025-11-18T07:59:12+5:30
saudi arabia bus accident: सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीय भाविकांचा मृत्यू झाला.

saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीय भाविकांचा मृत्यू झाला असून, त्यातील बहुतांश जण तेलंगणाचे रहिवासी होते. हैदराबादच्या एकाच कुटुंबातील १८ जण या अपघातात मृत्युमुखी पडले, यात त्यांच्या ३ पिढ्यांचा दुर्दैवी अंत झाला. मक्केहून मदिनेला जाणारी बस तेलवाहू टँकरला धडकून ही दुर्घटना घडली. जेद्दातील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.
२३ नोव्हेंबरला यात्रेकरू भारतात परतणार होते
तेलंगणाहून मक्का-मदिनेला यात्रेसाठी गेलेल्या ५४ जणांपैकी चारजण मदिनाकडे कारने गेले तसेच अन्य चारजण मक्का येथे थांबले व बाकीचे लोक बसने मक्केहून मदिनाला रवाना झाले होते. हे सर्व भाविक येत्या २३ नोव्हेंबरला भारतात परतणार होते. या अपघातात केवळ एकच जण वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.