शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban: ...तोवर तालिबान काबुलमध्ये घुसणार नव्हता, गनींनी खेळ बिघडवला; माजी राष्ट्राध्यक्ष करझईंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 21:00 IST

Story Behind Afghanistan Fall by Hamid Karzai: काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी तालिबानींना घुसू दिले नसते तर त्यांनी लुटपाट, उच्छाद मांडला असता असे म्हटले होते. 

दहशतवादी संघटना तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा करून आता काही महिने लोटले आहेत. जगाचेही लक्ष आता ओमायक्रॉन व्हेरिअंटकडे वळले आहे. अशातच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी मोठा गौप्यस्फोट करत खाली बसलेला धुरळा पुन्हा उडविण्याचा प्रयत्न केला आहे. एपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. 

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पलायन केल्यानंतर त्यांनीच तालिबानला शहरात येण्यासाठी निमंत्रण दिल्याचा दावा करझई यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी तालिबानींना घुसू दिले नसते तर त्यांनी लुटपाट, उच्छाद मांडला असता असे म्हटले होते. 

करझई यांनी सांगितले की, तालिबानला काबुलमध्ये येण्याचे निमंत्रण हे लोकांचे संरक्षण करण्याच्या हेतून देण्यात आले होते. अफगाणिस्तान आणि काबुल दोन्ही संकटात सापडले असते. जे दहशतवादी विचार आजवर देशाला लुटत होते, त्यांनी काबुल व इतर शहरांची दुकानेही लुटली असती. गनींसोबत देशाची सुरक्षा हाती असलेले अधिकारी देखील पळून गेले होते. 

तालिबानला काबुलमध्ये घुसायचे नव्हते....करझई आणि अब्दुल्ला यांनी गनीसोबत बैठक घेतली. यामध्ये सत्तेत भागीदारीसोबत अन्य 15 मुद्द्यांवर पुढच्याच दिवशी ते दोहाला जाणार होते. तालिबान तोवर काबुलच्या बाहेरील भागात पोहोचले होते. मात्र, जोपर्यंत सरकार आणि तालिबानमध्ये समझोता होत नाही तोवर काबुलमध्ये घुसणार नाही, असा वादा तालिबानी नेत्यांनी कतरमध्ये केला होता, असा दावा करझई यांनी केला आहे. मात्र, गनी यांनी देश सोडल्याने सारे वातावरणच बिघडले. दुपारी पावणे तीन वाजता गणी गेल्याचे स्पष्ट झाले. संरक्षण मंत्री, गृह मंत्री आणि काबुलचे पोलीस प्रमुख यांच्याशी संपर्क केला, तेव्हा ते देखील देश सोडून पळाल्याचे समजले. यानंतर तालिबानला मी काबुलचा ताबा घेण्याचे निमंत्रण दिल्याचे करझई म्हणाले.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान