प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 08:03 IST2025-12-04T08:02:18+5:302025-12-04T08:03:34+5:30
Thunderbirds F-16C Fighting Falcon Crash: अमेरिकन हवाई दलाच्या एलिट 'थंडरबर्ड्स' डेमॉन्स्ट्रेशन स्क्वॉड्रनचे एक एफ-१६ सी फायटिंग फाल्कन लढाऊ विमान बुधवारी सकाळी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात कोसळले.

प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
अमेरिकन हवाई दलाच्या एलिट 'थंडरबर्ड्स' डेमॉन्स्ट्रेशन स्क्वॉड्रनचे एक एफ-१६ सी फायटिंग फाल्कन लढाऊ विमान बुधवारी सकाळी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात कोसळले. प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हा अपघात झाला, अशी माहिती लष्कराने दिली आहे. अपघातादरम्यान वैमानिक जेटमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. या अपघातात वैमानिकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी १०:४५ वाजता कॅलिफोर्नियाच्या नियंत्रित हवाई क्षेत्रात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान झाला. विमानाने आपत्कालीन परिस्थितीची तक्रार नोंदवल्यानंतर, अग्निशमन विभागाने लॉस एंजेलिसच्या उत्तरेस सुमारे २९० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोजावे वाळवंटातील ट्रोना क्षेत्राजवळ अपघात झाल्याची नोंद घेतली. या विमान अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली. ५७ व्या विंग पब्लिक अफेयर्स ऑफिसकडून अधिक माहिती जाहीर केली जाईल.
१९५३ मध्ये स्थापन झालेले 'थंडरबर्ड्स' हे एअर शोमध्ये जवळून उड्डाण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, जिथे वैमानिक एकमेकांपासून इंच अंतरावर सराव करतात. ही टीम एफ-१६ फाल्कन, एफ-२२ रॅप्टर आणि ए-१० वॉर्थॉग सारखी विमाने वापरते आणि लास वेगासजवळील नेलिस एअर फोर्स बेसवर हंगामी प्रशिक्षण घेते.
यापूर्वी २०२२ मध्ये, नेव्हीचे F/A-18E सुपर हॉर्नेट जेट ट्रोनाजवळ कोसळले होते, ज्यात पायलटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पोलंडमध्ये एअर शोच्या रिहर्सल दरम्यान एक एफ-१६ लढाऊ विमान कोसळल्याने पायलटने आपले प्राण गमावले.