जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:40 IST2025-08-13T12:38:55+5:302025-08-13T12:40:43+5:30

या देशात गेल्या ४८ तासांत भूकंपाचे ८७९ छोटे-मोठे धक्के जाणवले आहेत. तर, दर तासाला सरासरी १८ भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

'This' country on the world map has become the epicenter of earthquakes; 18 earthquakes are felt every hour! | जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!

जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!

तुर्कस्तानमध्ये २ वर्षांनंतर पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. तुर्कीतील अनेक भागात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेल्या ४८ तासांत तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे ८७९ छोटे-मोठे धक्के जाणवले आहेत. तुर्कस्तानमध्ये दर तासाला सरासरी १८ भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तुर्कस्तानच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, रविवारी (१० ऑगस्ट) बालिकेसिर प्रांतात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी नोंदवण्यात आली होती. त्यानंतर सुमारे ८७९ भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

तुर्की टुडेच्या मते, १२० भूकंप ३-४ तीव्रतेचे जाणवले. तर, १७ भूकंप ४-५ तीव्रतेचे जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ११ किमी खाली आहे. बहुतेक भूकंप ३ पेक्षा कमी तीव्रतेचे जाणवले.

तुर्कीच्या गृहमंत्रालयाने लोकांना भूकंपामुळे घाबरू नका असा सल्ला दिला आहे. तसेच, लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. तुर्की सरकारने भूकंपामुळे फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या व्यतिरिक्त कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपामुळे ६८ गावांमधील १६ इमारती कोसळल्या आहेत. सरकारने या इमारती बांधणाऱ्या कंत्राटदाराला अटक केली आहे.

तुर्कीमध्ये वारंवार भूकंप का होतात?
तुर्कस्तानमध्ये वारंवार भूकंप होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तुर्कस्तान हे अॅनाटोलियन प्लेट, युरेशियन प्लेट आणि अरेबियन प्लेटवर स्थित आहे. जर तीन प्लेटपैकी कोणत्याही प्लेटमध्ये घर्षण झाले तर तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात.

सध्या तुर्कीमध्ये २ फॉल्ट लाईन्स सक्रिय आहेत. पहिली फॉल्ट लाईन उत्तर अनातोली फॉल्ट आणि दुसरी पूर्व अनातोली फॉल्ट आहे. या दोन्ही फॉल्टमुळे तुर्कीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात.

८५ वर्षांत १३ मोठे भूकंप, १.२० लाख मृत्यू!
१९३९ मध्ये तुर्कीमध्ये एक मोठा भूकंप जाणवला होता. अधिकृतपणे, या भूकंपात ३३ हजार लोकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून, तुर्कीमध्ये सुमारे १३ मोठे भूकंप झाले आहेत. तुर्की सरकारच्या मते, भूकंपांमुळे तुर्कीमध्ये १.२० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. २०२३ मध्ये, तुर्कीमध्ये भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक ५० हजार होती. त्यानंतर, तुर्की सरकारने इमारतींच्या बांधकामावर लक्ष केंद्रित केले.

Web Title: 'This' country on the world map has become the epicenter of earthquakes; 18 earthquakes are felt every hour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.