जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:59 IST2025-05-22T10:56:51+5:302025-05-22T10:59:29+5:30
Baba Vanga Predictions : २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
बाबा वेंगा यांनी केलेली भाकितं आजवर अनेकदा खरी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. ९/११ चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट किंवा त्सुनामीचा विनाश, सोव्हिएत युनियनचे पतन, चेरनोबिल दुर्घटना आणि अगदी बराक ओबामा राष्ट्रपती होण्याची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. आता जग २०२५ मध्ये वावरत आहे. २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.
२०२५ सालासाठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी २०२५ सालासाठी भाकीत केले आहे की, हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अस्थिर असू शकते, राजकीय तणाव वाढेल, व्यापाराबाबत मोठ्या देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बिघडत्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. यासोबतच, बाबा वेंगाच्या भाकितात असाही दावा केला आहे की, मानवतेचं पतन २०२५मध्ये सुरू होईल आणि ५०७९ पर्यंत जगाचा अंत होईल.
भाकितं ठरली खरी!
बाबा वेंगाच्या सर्व भाकितांपैकी आतापर्यंत भूकंपाची भाकिते पूर्णपणे खरी होती. २८ मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडच्या काही भागात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
२०२५ च्या सुरुवातीला चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉर तीव्र झाला. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर १४५ टक्क्यांपर्यंत कर लादले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाबाबत शेअर बाजारात अनिश्चितता सुरूच आहे. त्याच वेळी, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षावरून बाबा वेंगा यांचे २०२५ साठीचे भाकीत खरे ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळले आहेत.
बाबा वेंगा यांनी आणखी काय भाकितं केली?
> २०२५ मध्ये युरोपमधील संघर्षामुळे खंडातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल.
> २०२८ मध्ये, मानव ऊर्जा स्रोत म्हणून शुक्र ग्रहाचा शोध घेण्यास सुरुवात करतील.
> २०३३ मध्ये, जगभरात समुद्राची पातळी वाढेल.
> २०७६ मध्ये साम्यवाद जगभरातील देशांमध्ये पसरेल.
> २१३० मध्ये, मानव परग्रही लोकांशी संपर्क साधू शकतात.
> २१७० मध्ये भीषण दुष्काळ पडेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल.
> ३००५ पृथ्वी मंगळावरील संस्कृतीशी युद्ध करते.
> ३७९७ मध्ये पृथ्वी रिकामी करावी लागेल कारण ती राहण्यायोग्य राहणार नाही.
> तर, ५०७९ मध्ये या जगाचा अंत होईल.