शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

अमेरिकेत काहीही होऊ शकते...आता ट्रम्प यांच्यावरील लेखावरून सट्टेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 4:16 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात काल न्यूयॉर्क टाइम्समध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर छापून आलेल्या लेखावर अमेरिकेमध्ये खळबऴ माजली आहे. हा लेख कोणी लिहीला असेल यावरून सट्टेबाजीलाही उत आला आहे. उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर संशयाची सुई वळत असून परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांचेही नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे. ट्रम्प यांच्यावरून बरेच ...

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात काल न्यूयॉर्क टाइम्समध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर छापून आलेल्या लेखावर अमेरिकेमध्ये खळबऴ माजली आहे. हा लेख कोणी लिहीला असेल यावरून सट्टेबाजीलाही उत आला आहे. उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर संशयाची सुई वळत असून परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांचेही नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे. 

ट्रम्प यांच्यावरून बरेच वादविवाद होत असल्याने लवकरच अमेरिकेमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतात, असे सट्टेबाजीवरील मायबुकी या वेबसाईटचे मुख्य व्यवस्थापक जॅक स्लेटर यांनी सांगितले. तसेच या संधीचा फायदा उठवण्यासाठी सट्टेबाज तयारीत असल्याचेही ते पुढे म्हणाले.

 न्यूयॉर्क टाइम्समध्ये हा लेख लिहिणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी 100 डॉलरची पैज लावण्यात आली आहे. जिंकणाऱ्याला दुप्पट रक्कम दिली जाणार आहे. आता पर्यंत 5 हजार डॉलरच्या पैजा लागल्या आहेत. सर्वाधिक रक्कम उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर लागली आहे. तर शिक्षण मंत्री बेट्से डेवॉस आणि परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुख्य सचिव स्टीवन मनुचिन यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती देण्यात आली आहे. 

एका अमेरिकी अधिकाऱ्याने 'आई एम पार्ट ऑफ रेजिस्टेंस इनसाइड द ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन' या मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध झाला होता. यामध्ये या अधिकाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका