शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

इथं तयार होतोय जगातला पहिला 'गोल्डन स्ट्रीट', पूर्ण होईल 'सोन्याच्या रस्ता'वरून चालायचं स्वप्न; सरकारनं शेअर केला पहिला VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:26 IST

हा प्रकल्प केवळ व्यापारालाच नव्हे, तर पर्यटनालाही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. जगभरातील लोक आता या सोन्याच्या रस्त्यावरून चलण्याची वाट बघत आहेत...

जगात आपल्या भव्य, दिव्य, कल्पक आणि आकर्षित करणाऱ्या प्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबईने आता एका अत्यंत अनोख्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. आता दुबई जगातील पहिली 'गोल्ड स्ट्रीट' बनवण्याच्या तयारीत आहे. हा रस्ता सोन्याच्या घटकांपासून बनवला तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प नव्या 'दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट'चा एक भाग असेल. याला 'सोने का घर' (Home of Gold) असेही म्हटले जात आहे. दुबईला सोन्याच्या व्यापाराचे जागतिक केंद्र बनवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महत्वाचे म्हणजे, हा जगातील पहिलाच 'गोल्ड स्ट्रीट' अथवा 'सोन्याचा रस्ता' असेल. 

हा रस्ता दुबईतील प्रसिद्ध 'डेरा' परिसरात तयार करण्यात येणार आहे. हा परिसर आधीच 'गोल्ड सौक'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. या नवीन डिस्ट्रिक्टमध्ये रिटेल दुकाने, होलसेल ट्रेडिंग, सोन्याच्या विटा (Bullion) आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, येथे तब्बल १ हजारहून अधिक रिटेल सोन्याची दुकाने असणार आहेत. ही दुकाने पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतील.

हा प्रोजेक्ट दुबईचा अर्थ विभाग आणि पर्यटन विभागांतर्गत (DET) राबवला जात आहे. यासंदर्भात बोलताना DFRE चे CEO अहमद अल खाजा म्हणाले, सोने दुबईची संस्कृती, वारसा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या प्रोजेक्टमुळे सोन्याचे जागतिक केंद्र म्हणून दुबईची प्रतिमा आणखी मोठी होईल.

सरकारनं जारी केला पहिला VIDEO - दुबई सरकारने या प्रोजेक्टचा पहिला व्हिडिओ जारी केला आहे. बुर्ज खलीफा आणि पाम आयलँड्सनंतर आता हा 'गोल्ड स्ट्रीट' दुबईची नवी ओळख बनणेल. या रस्त्याचे नेमके डिझाइन, लोकेशन आणि तो पूर्ण होण्याच्या मुदतीची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे. हा प्रकल्प केवळ व्यापारालाच नव्हे, तर पर्यटनालाही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. जगभरातील लोक आता दुबईमध्ये या सोन्याच्या रस्त्यावरून चलण्याची वाट बघत आहेत. 

टॅग्स :DubaiदुबईGoldसोनं