इथं तयार होतोय जगातला पहिला 'गोल्डन स्ट्रीट', पूर्ण होईल 'सोन्याच्या रस्ता'वरून चालायचं स्वप्न; सरकारनं शेअर केला पहिला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:26 IST2026-01-29T19:25:26+5:302026-01-29T19:26:14+5:30
हा प्रकल्प केवळ व्यापारालाच नव्हे, तर पर्यटनालाही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. जगभरातील लोक आता या सोन्याच्या रस्त्यावरून चलण्याची वाट बघत आहेत...

इथं तयार होतोय जगातला पहिला 'गोल्डन स्ट्रीट', पूर्ण होईल 'सोन्याच्या रस्ता'वरून चालायचं स्वप्न; सरकारनं शेअर केला पहिला VIDEO
जगात आपल्या भव्य, दिव्य, कल्पक आणि आकर्षित करणाऱ्या प्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबईने आता एका अत्यंत अनोख्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. आता दुबई जगातील पहिली 'गोल्ड स्ट्रीट' बनवण्याच्या तयारीत आहे. हा रस्ता सोन्याच्या घटकांपासून बनवला तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प नव्या 'दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट'चा एक भाग असेल. याला 'सोने का घर' (Home of Gold) असेही म्हटले जात आहे. दुबईला सोन्याच्या व्यापाराचे जागतिक केंद्र बनवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महत्वाचे म्हणजे, हा जगातील पहिलाच 'गोल्ड स्ट्रीट' अथवा 'सोन्याचा रस्ता' असेल.
हा रस्ता दुबईतील प्रसिद्ध 'डेरा' परिसरात तयार करण्यात येणार आहे. हा परिसर आधीच 'गोल्ड सौक'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. या नवीन डिस्ट्रिक्टमध्ये रिटेल दुकाने, होलसेल ट्रेडिंग, सोन्याच्या विटा (Bullion) आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, येथे तब्बल १ हजारहून अधिक रिटेल सोन्याची दुकाने असणार आहेत. ही दुकाने पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतील.
हा प्रोजेक्ट दुबईचा अर्थ विभाग आणि पर्यटन विभागांतर्गत (DET) राबवला जात आहे. यासंदर्भात बोलताना DFRE चे CEO अहमद अल खाजा म्हणाले, सोने दुबईची संस्कृती, वारसा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या प्रोजेक्टमुळे सोन्याचे जागतिक केंद्र म्हणून दुबईची प्रतिमा आणखी मोठी होईल.
Ithra Dubai officially launches Dubai Gold District, a purpose-built destination designed to strengthen Dubai’s position as the world’s leading hub for the gold and jewellery trade. Developed as a unified ecosystem, the District features more than 1,000 retailers and brings… pic.twitter.com/sY1ekO65PO
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) January 27, 2026
सरकारनं जारी केला पहिला VIDEO -
दुबई सरकारने या प्रोजेक्टचा पहिला व्हिडिओ जारी केला आहे. बुर्ज खलीफा आणि पाम आयलँड्सनंतर आता हा 'गोल्ड स्ट्रीट' दुबईची नवी ओळख बनणेल. या रस्त्याचे नेमके डिझाइन, लोकेशन आणि तो पूर्ण होण्याच्या मुदतीची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे. हा प्रकल्प केवळ व्यापारालाच नव्हे, तर पर्यटनालाही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. जगभरातील लोक आता दुबईमध्ये या सोन्याच्या रस्त्यावरून चलण्याची वाट बघत आहेत.