युद्ध आणखी पेटणार..., आता पाकिस्तान सौदीच्या मदतीसाठी मैदानात उतरणार? मुनीर रियाधमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:29 IST2026-03-07T12:20:50+5:302026-03-07T12:29:50+5:30

इराणच्या या कृतीने संपूर्ण प्रदेशाची सुरक्षितता आणि स्थिरता धोक्यात येत आहे. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. इराणी पक्ष समजदारी दाखवेल आणि कुठलीही चुका करणे टाळेल, अशी आम्हाला आशा आहे."

The war will flare up even more Now will Pakistan come to the aid of Saudi Arabia Munir in Riyadh | युद्ध आणखी पेटणार..., आता पाकिस्तान सौदीच्या मदतीसाठी मैदानात उतरणार? मुनीर रियाधमध्ये!

युद्ध आणखी पेटणार..., आता पाकिस्तान सौदीच्या मदतीसाठी मैदानात उतरणार? मुनीर रियाधमध्ये!


सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात खुद्द प्रिन्स खालिद यांनी 'X' पोस्ट करत माहिती दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, "मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा संरक्षण दल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची भेट घेतली. आमच्या संयुक्त धोरणात्मक संरक्षण कराराच्या कक्षेत झालेल्या इराणच्या हल्ल्यांसंदर्भात आणि ते रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा झाली. इराणच्या या कृतीने संपूर्ण प्रदेशाची सुरक्षितता आणि स्थिरता धोक्यात येत आहे. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. इराणी पक्ष समजदारी दाखवेल आणि कुठलीही चुका करणे टाळेल, अशी आम्हाला आशा आहे."

पाकिस्तानची कोंडी?
तज्ज्ञांच्या मते, इराणच्या आक्रमकतेचा सामना एकट्याने करण्याची सौदीची इच्छा नाही. यासाठी तो पाकिस्तानला आपल्या बाजूने लढण्यास भाग पाडत आहे. दोन्ही देशांमधील विद्यमान संयुक्त धोरणात्मक संरक्षण करारानुसार, सौदी अरेबिया पाकिस्तानला स्वतःसाठी लढण्यास भाग पाडू शकतो. आर्थिक मदत, तेल पुरवठा आणि गुंतवणुकीद्वारे सौदी अरेबिया, आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या पाकिस्तानला मदत करतो. शिवाय, पाकिस्तानकडेही मदत करण्याशिवाय पर्याय उरत नाही. यामुळे आता खालिद आणि मुनीर भेटीनंतर, पाकिस्तान इराणविरुद्ध कारवाई करेल का? हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरेल.

इराणचे जबरदस्त हल्ले - 
खरेतर, इराणकडून सौदीवर सातत्याने हल्ले होत असतानाच ही भेट झाली आहे. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, 'शायबह ऑईल फिल्ड'च्या दिशेने येणारे १६ ड्रोन हवाई दलाने पाडले. तसेच अल-खरज येथील प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर आलेली बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली आहेत. २८ फेब्रुवारीनंतरचा हा इराणचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

वाढता तणाव
प्रदेशातील वाढत्या तणावाबरोबरच, युएईनेही गेल्या २४ तासांत १२५ हून अधिक ड्रोन आणि ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निकामी केली आहेत. खरेतर, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून, इराणकडून हे हल्ले केले जात आहेत. दरम्यान, अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटनेने (OIC) या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

Web Title : युद्ध और भड़का: क्या पाकिस्तान सऊदी की मदद के लिए उतरेगा?

Web Summary : सऊदी अरब ने ईरान के हमलों के खिलाफ पाकिस्तान से समर्थन मांगा है, आपसी रक्षा समझौते का हवाला दिया है। हालिया बैठकों से संकेत मिलता है कि सऊदी अरब ईरान के आक्रमण का मुकाबला करने में पाकिस्तान की सहायता चाहता है, खासकर सऊदी तेल क्षेत्रों और औद्योगिक क्षेत्रों पर हमलों के बाद। पाकिस्तान की भागीदारी अनिश्चित बनी हुई है।

Web Title : War Escalates: Pakistan to help Saudi against Iran?

Web Summary : Saudi Arabia seeks Pakistan's support against Iranian attacks, citing a mutual defense pact. Recent meetings indicate Saudi Arabia's desire for Pakistan to assist in countering Iranian aggression, especially after attacks on Saudi oil fields and industrial areas. Pakistan's involvement remains uncertain.