ब्राझीलमधील साओ पावलो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटलांटाला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाच्या इंजिनला उड्डाणानंतर काही मिनिटांतच आग लागल्याने विमानात घबराट पसरली. ही घटना रविवारी घडली असून, या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पायलटने वेळीच निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
इराण युद्धावर उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार; चीन-पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य होणार?
डेल्टा एअरलाइन्सच्या एअरबस A330-300 या विमानात २७२ प्रवासी आणि १४ कर्मचारी होते. उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या एका इंजिनमधून ज्वाला आणि ठिणग्या बाहेर पडू लागल्या. परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून वैमानिकाने तात्काळ आणीबाणी जाहीर केली आणि विमान विमानतळावर परत आणण्याचा निर्णय घेतला.
उड्डाणादरम्यान ठिणग्या दिसल्या
व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाच्या डाव्या इंजिनमधून मोठा आवाज, ठिणग्या आणि ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. ही घटना गारुल्होस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना घडली.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकाला विमानाच्या पंखाला आग लागल्याचा इशारा दिला. वैमानिकाने आपण तात्काळ परत येत असल्याचे सांगितले. इंजिनचे अवशेष जमिनीवर पडल्याने धावपट्टीजवळ थोडी आग लागली. विमानामधील प्रवासी भीतीने ओरडायला लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणानंतर सुमारे नऊ मिनिटांनी विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. विमान उतरल्यानंतर, विमानतळावरील बचाव पथक आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. एअरलाइनने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही घटना विमानाच्या डाव्या इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे घडली. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफी मागितली.
Web Summary : A Delta Air Lines flight from São Paulo to Atlanta experienced an engine fire shortly after takeoff. The pilot declared an emergency and safely returned to the airport with 272 passengers and 14 crew members. The incident was due to a technical fault in the left engine.
Web Summary : साओ पाउलो से अटलांटा जा रही डेल्टा एयर लाइन्स की उड़ान में उड़ान भरने के तुरंत बाद इंजन में आग लग गई। पायलट ने आपातकाल घोषित किया और 272 यात्रियों और 14 चालक दल के सदस्यों के साथ सुरक्षित रूप से हवाई अड्डे पर वापस लौट आया। यह घटना बाएं इंजन में तकनीकी खराबी के कारण हुई।