उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या इंजिनला लागली आग, मोठा अपघात टळला, आकाशात दिसल्या ठिणग्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:20 IST2026-04-01T18:05:22+5:302026-04-01T18:20:00+5:30
ब्राझीलमधील साओ पावलो येथून अटलांटाला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाच्या उड्डाणानंतर थोड्याच वेळात एका इंजिनला आग लागली. एअरबस A330 -300 या विमानात २७२ प्रवासी आणि १४ कर्मचारी होते.

उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या इंजिनला लागली आग, मोठा अपघात टळला, आकाशात दिसल्या ठिणग्या
ब्राझीलमधील साओ पावलो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटलांटाला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाच्या इंजिनला उड्डाणानंतर काही मिनिटांतच आग लागल्याने विमानात घबराट पसरली. ही घटना रविवारी घडली असून, या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पायलटने वेळीच निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
इराण युद्धावर उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार; चीन-पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य होणार?
डेल्टा एअरलाइन्सच्या एअरबस A330-300 या विमानात २७२ प्रवासी आणि १४ कर्मचारी होते. उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या एका इंजिनमधून ज्वाला आणि ठिणग्या बाहेर पडू लागल्या. परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून वैमानिकाने तात्काळ आणीबाणी जाहीर केली आणि विमान विमानतळावर परत आणण्याचा निर्णय घेतला.
उड्डाणादरम्यान ठिणग्या दिसल्या
व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाच्या डाव्या इंजिनमधून मोठा आवाज, ठिणग्या आणि ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. ही घटना गारुल्होस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना घडली.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकाला विमानाच्या पंखाला आग लागल्याचा इशारा दिला. वैमानिकाने आपण तात्काळ परत येत असल्याचे सांगितले. इंजिनचे अवशेष जमिनीवर पडल्याने धावपट्टीजवळ थोडी आग लागली. विमानामधील प्रवासी भीतीने ओरडायला लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणानंतर सुमारे नऊ मिनिटांनी विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. विमान उतरल्यानंतर, विमानतळावरील बचाव पथक आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. एअरलाइनने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही घटना विमानाच्या डाव्या इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे घडली. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफी मागितली.
Following the Delta A330-323(N813NW) engine failure after departure from São Paulo (GRU), many are asking: what actually happens if an airliner loses an engine just after takeoff?
As passenger in the cabin watching this scenario unfold, the panic is understandable. Seeing flames… pic.twitter.com/7vTod7WHKK— Turbine Traveller (@Turbinetraveler) March 30, 2026