नशेच्या धुंदीत नववधूसोबत रोमँटिक होत होता वर, तेवढ्यात घडला अपघात आणि पोहोचला रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:07 IST2022-10-04T15:06:33+5:302022-10-04T15:07:15+5:30
Marriage News: लग्न झाल्यावर लग्नाचा पहिला दिवस आणि पहिली रात्र अविस्मरणीय ठरावी अशी प्रत्येक वधु-वराची इच्छा असते. मात्र लग्नाच्या दिवशी एका नवरदेवासोबत अपघात घडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नशेच्या धुंदीत नववधूसोबत रोमँटिक होत होता वर, तेवढ्यात घडला अपघात आणि पोहोचला रुग्णालयात
मेलबर्न - लग्न झाल्यावर लग्नाचा पहिला दिवस आणि पहिली रात्र अविस्मरणीय ठरावी अशी प्रत्येक वधु-वराची इच्छा असते. मात्र लग्नाच्या दिवशी एका नवरदेवासोबत अपघात घडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे झाले असे की, हा नवरदेव नववधूसमोर डान्स करत होता. त्यावेळी तो फ्लोअरवर पडला आणि त्यात त्याचा कोपर दुखावला. त्यानंतर या वराला तातडीने रुग्णालयात न्यावे लागले.
व्हीडिओग्राफर टॉम हीली यांनी या घटनेचा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियातील अॅडम क्वीन त्यांच्या पत्नीला सांगतात की, ते तिच्यावर खूप प्रेम करतात. त्यानंतर अॅडम पत्नीसमोर डान्स फ्लोअरवर जातात.
त्यानंतर अॅडम एका सर्कलवर डान्स करत असलेल्या मित्रांमध्ये पोहोचतात. त्यावेळी नाचताना ते पडतात. त्यानंतरच्या व्हिडीओमध्ये पॅरामेडिक्स अॅडम्स यांना स्ट्रेचरवरून अॅम्ब्युलन्समध्ये नेताना दिसतात.
या घटनेबाबत हेलन यांनी सांगितले की, हा अपघात लग्न झाल्यानंतर काही तासांतच घडला. दरम्यान, हा अपघात घडला तेव्हा अॅडमने बीयर प्यायली होती. तसेच नशेत असल्यामुळे हा अपघात घडला.
या अपघातामुळे मित्र आणि नातेवाईकांसोबत लग्न एन्जॉय करण्याऐवजी या जोडप्याला लग्नाची रात्रही रुग्णालयात घालवावी लागली. हेलनने या अपघाताचा एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ती वधूच्या वेशामध्ये रुग्णालयात बेडवर अॅडमच्या बाजूला झोपलेली दिसत आहे.