'धन्यवाद भारत', भारताने अब्दुल रौफ अझहरचा खात्मा केला; अमेरिका म्हणाली, "न्याय झाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:46 IST2025-05-09T12:30:19+5:302025-05-09T12:46:57+5:30
भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली. कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल रौफ अझहर याला ठार मारले आहे.

'धन्यवाद भारत', भारताने अब्दुल रौफ अझहरचा खात्मा केला; अमेरिका म्हणाली, "न्याय झाला..."
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल रौफ अझहर याला ठार मारले आहे. भारताच्या या कारवाईचा जागतिक परिणाम आता दिसून येत आहे. अब्दुल अझहरच्या मृत्यूबद्दल अमेरिकेनेही जाहीरपणे भारताचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैशचा मुख्य ऑपरेशनल मास्टरमाइंड आणि मसूद अझहरचा भाऊ अब्दुल अझहरच्या मृत्युमुळे अमेरिका आनंदित दिसत आहे.
अमेरिकेचे माजी राजदूत आणि संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरूपी प्रतिनिधी झल्मय खलीलजाद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केले आहे. यामध्ये म्हटले की, "पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईत भारताने क्रूर दहशतवादी अब्दुल रौफ अझहरला ठार मारले आहे. हा तोच व्यक्ती आहे, त्याने २००२ मध्ये ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचा शिरच्छेद करून हत्या केली होती. आज न्याय झाला आहे. भारताचे आभार.", असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
भारताच्या लष्करी कारवाईत मारल्या गेलेल्या अब्दुल रौफच्या मृत्यूला अमेरिकेने 'न्याय मिळाला' असे म्हटले आहे. कुख्यात दहशतवाद्याच्या मृत्यूने अमेरिका तसेच ज्यू समुदाय समाधानी असल्याचे दिसून येते.
अब्दुल अझहरचा डॅनियल पर्लच्या हत्येशी संबंध
२००२ मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या एका भयानक हत्येत, वॉल स्ट्रीट जर्नलचे वरिष्ठ पत्रकार डॅनियल पर्ल यांचा शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जग हादरले. अब्दुल रौफ हा या हत्येचा सूत्रधार होता आणि अमेरिकन एजन्सी बराच काळ त्याचा शोध घेत होत्या.
अमेरिकन महिला राजदूताने पंतप्रधान मोदींना टॅग करुन धन्यवाद म्हटले. अब्दुल रौफ अझहरच्या हत्येवर अमेरिकेचे वरिष्ठ राजनयिक एली कोहानिम यांनीही भारताचे आभार मानले आहेत. पीएमओ इंडियाला टॅग करत त्यांनी लिहिले की, "आम्ही बऱ्याच काळापासून डॅनियल पर्लसाठी न्यायाची वाट पाहत होतो. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मी वैयक्तिकरित्या भारत सरकारची आभारी आहे."
भारताने केलेल्या कारवाईला इस्रायली वृत्तपत्र 'द जेरुसलेम पोस्ट' ने ठळकपणे कव्हर केले होते. भारताच्या या कारवाईमुळे जगभरातील ज्यू समुदायाला दिलासा मिळत आहे. जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध भारताच्या कारवाईला जागतिक पाठिंबा मिळत आहे.